पिंपरी चिंचवडची चिंता वाढली ! एकाच दिवशी सहा कोरोना पॉझिटीव्ह; रुग्णांची संख्या गेली नऊवर
पिंपरी (वास्तव संघर्ष) महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे त्यातच आता पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. शहरात आतापर्यंत फक्त 12 जणांना कोरोनाची लागण झाली होती . ते बारा ठणठणीत बरे होतात न होतात आता शहरात नव्याने सहा कोरोनाग्रस्त रूग्णां पाॅझिटिव्ह झाल्याचे दिसून आले आहे. आता शहरात करोनाग्रस्त रूग्णांची संख्या नऊवर पोहचली आहे.
त्यामुळे पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाचा चिंता वाढली आहे . आज ( शनिवारी ) एकाच दिवशी नवीन सहाजण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत . त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या नऊवर गेली आहे . पाच वायसीएमधील आणि एकजण खासगी रुग्णालयात दाखल होता . ते कोरोना पाॅझिटिव्ह झाल्याचे स्पष्ट झाले आहे .