क्राईम बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

सावधान! पुणे वाईन शॉपच्या नावाने होत आहे दारू पिणा-याची आॅनलाईन फसवणूक

पिंपरी (वास्तव संघर्ष) देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने 3 में पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. या लाॅकडाऊनच्या काळात अनेकांना दारु पिण्यासाठी मूडमध्ये आले आहेत. तुम्ही जर घरबसल्या फोन करून दारू मागवण्याच्या तयारीत असाल तर जरा सावध राहा . कारण तुमची फसवणूक होऊ शकते . सध्या फेसबुक आणि वाटसप तसेच वेबसाईटवरील पुणे वाईन शॉपच्या नावाने फोननंबरद्वारे फसवणूक करणाऱ्या भुरट्यांनी पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात उच्छाद मांडला आहे .

पिंपरी चिंचवड पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी घरपोच दारू देण्याचे अमिष दाखवून ग्राहकांकडून अर्धे पैसे घेऊन नंतर दारू न देता पुर्ण पैसै देण्याचा हे भुरटे फसवणूक करित असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . पिंपरी चिंचवड शहरातील काही व्यक्तीं यांनी जेव्हा घरपोच दारू मागण्यासाठी या वेबसाईटवरील वाईनशॉपच्या नंबरवर फोन केला होता . त्यावेळी त्यांना ई – वॉलेटने दारूचे पेमेंट करायला सांगितले .

पेमंट केल्यावर बराच वेळ वाट बघूनही दारू घरपोच होत नसल्याने त्यांनी संबंधित नंबरला वारंवार काॅल केला असता ते पुर्ण पैशाची मागणी करत होते एकाने पैसे पुर्ण भरले तरीही दारू न देता हे भुरटे उलट त्यालाच ‘क्या करनेका है कर’ अशी धमकी देत आहेत . त्यामुळे या व्यक्तीने घरपोच दारू मागवल्यामुळे 500 ते 1000 रुपयांचा गंडा बसला आहे . अशी फसवणूक झाल्याचे कुणालाही लक्षात आले तर त्यांनी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करावी .

Share this: