दारू पिण्यासाठी तरुणाला लुटले ;सांगवी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) – रस्त्याने जाताना वाटेत अडवून तिघांनी त्याला दारू पिण्यासाठी पैसे मागितले . तरूणाने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याच्या खिशातील साडेसतराशे रूपये जबरस्तीने काढून घेतले . ही घटना पिंपळेगुरव येथे गुरूवारी रात्री साडेनऊ वाजता घडली .
सागर सुनिल अग्रवाल ( वय – 23 , रा . पिंपळे गुरव ) याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . पुनित कुंभार , विवेक चौरसिया , छोट्या ( रा . कदम बिल्डींग , शिवनेरी कॉलनी , पिंपळे गुरव ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सागर हा गुरुवारी रात्री मेडिकलमध्ये पायी जात होता . त्यावेळी आरोपींनी त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले . त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याच्या खिशातील साडेसतराशे रूपये जबरदस्तीने काढून घेतले . तसेच रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दोन मोटारीच्या काचा फोडून 20 हजार रूपयांचे नुकसान केले . सांगवी पोलीस तपास करत आहेत .