आई…! जागतिक मातृदिनानिमित्त विशेष लेख

माझ्या वयाच्या बाराव्या वर्षापासून मी माझ्या आईचा खूप तिरस्कार करत होतो..त्याला कारणही तसेच होते..एकतर माझी आई दिसायला रंगाने खूप काळी होती..आणि खूप लठ्ठ देखील होती..इतकंच काय तर तीला एका डोळ्याने दिसत देखील नव्हते..त्यामुळे ती त्या वयात मला खूप किलसवाणी वाटायची..वयाच्या एकविसाव्यावर्षी जेव्हा मी कॉलेज जीवनात शिकत होतो…त्यावेळी पालकसभेत मला मित्रांनी प्रश्न विचारला होता’ तु तुझ्या आईला कधीच का रे पालक सभेत आणत नाहीस…मी त्यांना म्हणालो होतो ..मला आईच नाही…त्यावेळी त्यांना माझ्यावर खूप जिव्हाला वाटला..माझी आई मेली…परंतू मला माहीत होते माझी आई जिवंत आहे परंतू तिच्या कुरूप दिसण्यामुळे माझी इज्जत जाऊ नये.. म्हणून मीच तीला पालक सभेत मुद्दाम आणत नव्हतो….मला कुरूप व्यक्ती आवडतच नव्हत्या त्यामुळे मी त्याच्यापासून लांबच रहात होतो…..
एव्हाना मी शिक्षण घेऊन वक़ील झालो होतो..शहरातील नामांकित वकिल म्हणून माझी ख्याती होती..मी लग्न करायचे ठरवले .. मी त्यावेळेसही ठरवले होते ..शहरातील सुंदर मुलीशीच मी लग्न करेल..आणि तसे केलेही..शहरातील मोठमोठ्या लोकांना मी लग्नपत्रिका दिली..फक्त निमंत्रण नव्हते ते माझ्या आईला..थोडं वाईट वाटत होतं पण माझ्या प्रेस्टिज चा प्रश्न होता..तीला बोलावून मला माझी लाज काढायची नव्हती…..माझी बायको दिसायला एकदम सुदंर, गोड आवाजाची अशी…लग्न झाल्यावर तीने देखील आयुष्यात कधी मला माझ्या आई बद्दल विचारले नाही..

एकदा मला ऑफिसमध्ये सकाळी कॉल आला…आई मेली म्हणून..ते एकल्यावर मला तेव्हा कसलही दुख किंवा शॉक वाटला नव्हता…मी माझ्या दिवसभराच्या सर्व अपॉयमेंट घेत होतो…सध्याकाळचे पाच वाजले होते..मी माझ्या ऑफ़िसमधून नॉर्मली घरी जाण्याच्या रत्याकडे वळालो..पण काही केल्या माझं मन लागेना..शेवटी मनाशिच म्हणालो’जाऊदे यार जिचा आपण आयुष्यभर तिरस्कार केला..ती आईच या जगात राहीली नाही..निदान तीचा एकुलता एक मुलगा म्हणून अत्यंसंस्कार तरी करू’ म्हणून मी गाडी माझी आई रहात असलेल्या जुन्या घरी वळवली…पाहतोतर काय घरी दरवाजाला लॉक होते..मी शेजारच्यांना विचारले मला फोन आलता येथे राहणारी म्हातारी गेली म्हणून…खरा होता का? तो फोन का कुणी गम्मत केली माझी..ते म्हणाले नाही वो खरा होता फोन…सकाळपासून त्या म्हाता-या आजीचा मृत्यु झालेला देह कुणाच्या तरी आशेसाठी निपचित पडला होता..संध्याकाळपर्यत तीच्या घरचे कुणीच नाही आले म्हणून मुन्सिपार्टीने तीला बेवारस म्हणून जाळून टाकले..

मग मी आमच्या जुन्या घराचे कुलुप तोडले..आईचं काही सामान माझ्या काही कामाचं आहे का शोधू लागलो.. अचानक एका जुन्या पेटीकडे माझी नजर गेली..त्या पेटीत नव्याको-या साडीवर जुनं सोन्याने मढवलेलं मगळसुत्र होतं…आणि एका वहीच्या पानावर काही तरी लिहीले होते..मी ते पान हातात घेऊन वाचू लागलो त्यामध्ये पत्रासारखा मजकुर होतो त्यात लिहीले होते…. प्रिय बेटा…तु जेव्हा जन्मला होता..तेव्हा मी सपुर्ण चाऴीत पेढे वाटले होते…तु कधी कोठे पडलास आणि तुला ज़ख़्म झाली तर माझ्या डोळ्यात पाणी येत होतं ..कारण तु माझ्या जिवाचा तुकडा होतास….तु दोन वर्षाचा झालास तेव्हा तुझे वडील आपल्याला सोडून गेले..मी तेही दुख पचवलं फक्त तुला पाहून…बेटा माझा दुख:चा बाण तेव्हा सुटला ज्या वेळेस तु पाच वर्षाचा असताना..तुझ्या डाव्या डोळ्यात काहीतरी झाले..मला कळेना काय करावं डॉक्टरांना दाखवले…त्यांनी काहीच सागितले नाही…फक्त औषध दिले..पण तुझ्या डोळ्यातील जळजळ काही थांबता थांबत नव्हती..तुझं दुख: मला सहन होत नव्हतं..मी देवऋक्षीला तुझ्या डोळ्याचे दाखवले पण काहीच नाही…उपास-तापास देव-धर्म सारं सारं केलं..पण काहीच फ़ायदा झाला नाही…शेवटी शहरातील मोठ्या डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवले..ते म्हणाले डोळा निकामी झाला आहे मुलांचा .मी डॉक्टरांना विनवणी करू लागले..काहीतरी करा वो …माझ्या बछड्याला माझ्या बेट्याचा डोळा वाचावा वो…त्यांनी मला सागितले तुम्ही त्याला नविन डोळा बसवा..त्या डोळ्याचे लाखों रूपयेही माझ्याकडे नव्हते..मी काय करू डॉक्टर…शेवटी मी माझा एक डोळा तुला दिला..माझं काय रे मी म्हातारी माझं सर्व जग पाहून झालं होतं…आणि एका डोळ्यानेही दिसतं की जग…पण तुझ्या सुंदर आयुष्यात दोन डोळे खूप महत्वाचे होते..ते तुला भेटले आणि सर्व काही तुला दिसू लागले..तु पुन्हा खेळू लागलास..सुंदर जग.सुंदर लोक पाहू लागलास..मनमुराद हसू लागलास.. बेटा तुझं लग्न ठरलं मला माहीत झालं तुझ्या भव्यदिव्य लग्नमंडपात मी आर्शिवाद देण्यासाठी नव्हे तुला नवरदेव म्हणून सजताना मला पहायचे होते रे ..ते ही माझ्या अभागीच्या नशीबी नव्हते..मला तुझ्या लग्नमंडपाच्या बाहेर उभ्या असलेल्या शिपायाने भिखारी म्हणून हाकलून दिले…माझी फाटकी ठिगलं लावलेली साड़ी पाहून म्हणला असेल जाऊदे..पण मी लोकांची घरची कामं करत माझ्या सुनेसाठी पेटीत ठेवलेलं मंगलसुत्र आणि नवीकोरी शालू घेतली आहे..ती माझ्या सुनेला नक्की दे बेटा …हे पत्र जेव्हा तुला मिळेल तेव्हा या जगात मी असेल कींवा नसेल पण जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तुझा डावा डोळा नक्की उडेल…. क्षणातच मी ढसाढसा तेथे रडू लागलो …चीड वाटू लागली मलाच माझी ज्या आईने दुखाचा डोंगर स्वता शिरावर घेत…मला प्रेंमाची आयुष्यभर सावली दिली.. तिला साधं मी डुकुनही पाहीलं नाही..ते तीच्या शेवटच्या मरणापर्यत… सुंदरता हा मोह आहे..दुनियामध्ये प्रेम हेच मोल आहे कळालं नाही मला….

त्या पत्रातील शेवटचे शब्द वाचून… मी रडून ज़मीनवर आई..आई…आई म्हणतच जमीनीवर कोसळलो..आईचे त्या पत्रातील शब्द होते..बेटा माझा कधी दुसरा जन्म झालाच तर देवाने फक्त आणि फक्त त्या जन्मात मला तुझ्यासारखाच मुलगा देवों ..फक्त तुझीच आई

“आई..”
लेखक-दिपक साबळे

( टिप -सदरील कथा ही कल्पनेवर आधारीत आहे.त्याचा वास्तवाशी कसलाही संबंध नाही.जर असं काही घडलंच तर तो निव्वल योगायोग समजावा.कथा आवडली तर शेर लाईक करा कृपया चोरी करून स्वताचे नाव टाकू नका. लेखणाचे सर्व अधिकार पत्रकार-दिपक साबळे यांच्या नावे राखून ठेवले आहेत.)

Share this: