बातम्यामहाराष्ट्र

‘मटका किंग’ रतन खत्री यांचे निधन;वयाच्या ८८ वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई (वृत्तसंस्था ) : ‘मटका किंग’ रतन खत्री यांचे निधन झाले आहे. मुंबईत शनिवारी सकाळी त्यांनी वयाच्या ८८ वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. शनिवारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. रतन खत्री मुंबई सेंट्रलमधील नवजीवन सोसायटीत आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. १९६० च्या काळात त्यांनी कल्याण भगत यांच्यासोबत मुंबईत मटक्याचा धंदा सुरू केला होता. खत्री भगत यांच्या धंद्यात मॅनेजर म्हणून रुजू झाले होते. १९६४ मध्ये खत्री यांनी भगतपासून वेगळे होऊन स्वत:चा रतन मटका धंदा सुरू केला.

पाहता पाहता त्यांचा धंदा एवढा लोकप्रिय झाला की, त्यांना ‘मटका किंग’च लोक म्हणू लागले. त्या काळात जुगाराची उलाढाल दररोज १ कोटी रुपयांच्या घरात होती.

Share this: