आरोग्यमाझं पिंपरी -चिंचवड

आनंदनगर झोपडपट्टीतील रहिवाशांना अन्न पाण्याची व वैद्यकीय सुविधा द्या -वंचीत बहुजन आघाडीची मागणी

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड आनंदनगर झोपडपट्टीत नुकतेच कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत या रुग्णांची संख्या वाढणार असून येथे राहणाऱ्या रहिवाशांना अन्न पाण्याची व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष गुलाब पानपाटील यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.

याबाबत त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, दिनांक ४/०५/२०२० रोजी ‘अ’ व ‘ब’ प्रभागात संदर्भातील परिसरात उपायोजना करणेबाबत आपणांस निवेदन पत्र देण्यात आले होते. त्यानुसार आपण कोणत्याही प्रकारची दखल न घेता कोणतीही उपाययोजना केलेली नाही. देशात COVID19 या विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू केलेला आहे.हा लॉकडाऊन 25 मार्च पासून टप्पे वाढविण्यात आलेला असून सध्या लॉकडाउनचे चौथे सत्र सुरू झालेला आहे.


आनंद नगर हा परिसर ‘अ’ प्रभाग याक्षत्रिय कार्यालय विभागात मोडत आहे. लॉकडाउन तिसरा टप्पा संपत असताना या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याचे वृत्त पसरलेला आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपणास दिनांक ४/०५/२०२० रोजीचे पत्रात काळजी घेण्यासंदर्भात कळविले होते.सदर परिसरातील नागरिकांना त्या परिसरापासून अलग करून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे.

त्या ठिकाणी या नागरिकांना कोणत्याही प्रकारचे व्यवस्थित अन्न पाण्याची व आरोग्याची व वैद्यकीय सेवा सुविधा मिळत नाही. त्यामुळे त्यांचे शोषण होऊन हाल होत आहेत. या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने, काही नागरिकांना हृदयविकारामुळे प्राण गमवावे लागेल. व त्याचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. या पत्राद्वारे आपणास खालील प्रमाणे मागणी करण्यात येत आहेत.

१) आनंद नगर येथील नागरिकांना विलगीकरण कक्षात येथील नागरिकांना विलगीकरण कक्षात योग्य अन्न, पाणी, आरोग्य व वैद्यकीय सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात.
२) सदर नागरिकांना अन्नपाणी हे योग्य ती तपासणी करुन अन्नातून विषबाधा होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी.
३) सदर नागरिकांना कोणत्याही प्रकारचे असमानतेची व भेदभावाची वागणूक देण्यात येऊ नये.
४) आनंद नगर परिसरात कोरोना या विषाणू बाबत जनजागृती करून जनजागृती करून बाबत दिलासादायक वातावरण निर्माण करण्यात यावे.
५) आनंद नगर येथील मजूर कामगार यांना बँक व मेडिकल या अत्यावश्यक सेवेसाठी तपासणी करून जाण्यास परवानगी देण्यात यावी.
आपण दिनांक ४/०५/२०२० रोजीचे पत्राची दखल न दखल घेतल्याने या परिसरात हा विषाणू चा चा प्रश्न उद्भवलेला आहे. त्यामुळे आपण जबाबदार आहात. पुन्हा अशी पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून सदरचे निवेदन देण्यात येत आहे. असे या निवेदनात म्हटले आहे.

Share this: