लग्नांमध्ये कार दिली नाही म्हणून सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ;सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगवी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात एका विवाहितेचा लग्नांमध्ये कार दिली नाही म्हणून सासरच्या मंडळींनी छळ केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी 34 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे .

त्यानुसार पती सोनल हरिराम चौरसिया ( रा . पिंपळे सौदागर ) , सासू किरण हरिराम चौरसिया , सासरे हरिराम चौरसिया , नणंद नेहा चौरसिया ( सर्व रा . सरस्वतीनगर , भोपाळ , मध्य प्रदेश ) यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांच्या माहेरच्या मंडळींनी फिर्यादी यांच्या लग्नात कार दिली नाही.या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना वारंवार त्रास दिला . त्यानंतर घर घेण्यासाठी वडिलांकडून 30 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करत वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केला , असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे .अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत

Share this: