क्राईम बातम्यामहाराष्ट्र

विराज जगताप हत्याकांड ; सोशलमिडीयावर भावना दुखावल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात एका तरुणाचा सहा जणांनी खून केला होता. या खुनाच्या संबंधित तरुणीचे फोटो सोशलमिडीयावर व्हायरल करण्यात आले होते. याबाबत एका तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सोशलमिडीयावर ज्या अकाऊंटवरून तरूणीचे फोटो व्हायरल केले त्या १८ जणांवर पिंपरी चिंचवड येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . माञ आता या खून प्रकरणात स्थानिक वृत्त वाहिनीने उपस्थित केलेल्या प्रश्नावर वादग्रस्त लेखी आणि ऑडिओ संदेशात भडक भाषा वापरून ते संदेश व्हॉट्सअॅपवर प्रसारित करत समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी तिघांविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या प्रकरणी मयूर मुंडे , आनंद जुनवणे व अन्य एक अनोळखी व्यक्तीवर ३ ९ ५ ( अ ) तसेच अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पिंपळे सौदागर येथील विराज जगताप खून प्रकरणानंतर एका खासगी ऑनलाइन वृत्त वाहिनीने खुनाला मुद्दामहून जातीय रंग चढवला जातोय , असे आपणास वाटते का , असा प्रश्न विचारला होता . त्यावर संशयित आरोपींनी एका विशिष्ट समाजाच्या भावना भडकविल्या जातील अशा पद्धतीने भडक भाषेत पोस्ट लिहिल्या होत्या .

आनंद जुनवणे याने श्रद्धास्थान असलेल्या व्यक्तीचे फोटो फाडून ते संबंधित समाजाच्या व्यक्तीनेच फाडले आहेत , अशी भडकावू भाषा ऑडिओ क्लिपमध्ये वापरून तो संदेश सर्व ग्रुपवर पाठवून एका समाजाच्या भावना दुखावल्या . तसेच समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Share this: