बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मागणीला आले यश;पत्रकारांची होणार मोफत अँटीजेन टेस्ट

नवी मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नवी मुंबई महानगरप्रमुख संपादक सुदिप घोलप यांनी दि.17/ जुलै/ 2020 रोजी अतिरिक्त आयुक्त जनसंपर्क विभाग, नवी मुंबई , मनपा यांना ईमेलद्वारे निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेऊन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पत्रकार, व्हिडीओ जर्नालिस्ट व फोटो जर्नालिस्ट यांची मोफत अँटीजेन टेस्ट नवी मुंबई मनपा मार्फत केले जाणार आहे.


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नवी मुंबई तर्फे मागणी करण्यात आल्याप्रमाणे, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वृत्तांकन करणारे (परंतु, ज्यांच्याकडे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र वास्तव्याचा पुरावा आहे) असे सर्व पत्रकार, व्हिडीओ जर्नालिस्ट, फोटो जर्नालिस्ट यांची ‘अँटीजेन टेस्ट’ मोफतपणे करण्याची महानगरपालिकेने विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे.

तरी, वास्तव्याचा पुरावा आणि पत्रकारितेचे अधिकृत ओळखपत्र सोबत घेवून सर्व पत्रकार, व्हिडीओ जर्नालिस्ट, फोटो जर्नालिस्ट इत्यादींनी सोमवार दि. 20 जुलै ते गुरुवार 30 जुलै दरम्यान सकाळी 11.00 वा. ते दुपारी 1.00 वा. दरम्यान आपली अँटीजेन टेस्ट करून घ्यावी असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नवी मुंबई महानगरप्रमुख सुदिप घोलप यांनी पत्रकारांना आवाहन केले आहे.

Share this: