दिपक साबळे :समाजभान जपणारा पिंपरीतील लढवय्या पञकार
संकलन :संपादक – प्रकाश जमाले..साप्ताहिक.. क्रांती प्रकाश
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर असंख्य गोरगरिबांना लाॅकडाऊनच्या काळात उपाशी पोटी राहू नये यासाठी अनेक सामाजिक संस्था यांनी जेवण पोहचवण्याची जबाबदारी हाती घेतली होती. कोणतीही सामाजिक संस्था,कुठल्याही राजकीय बॅनर पाठिंबा नसताना देखील आपल्या स्वतःच्या जवाबदारीवर या कठिण प्रसंगी शहरात एकटाच लढला तो वास्तव संघर्ष संपादक पञकार दिपक साबळे.. .
एकिकडे कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे संपुर्ण मानव जीवन चार भिंतींमध्ये बंदिस्त झाले . मात्र प्रेम , आपुलकी माणसाला जन्मजात लाभलेली नैसर्गिक देणगीच . त्यामुळे जागतिक युद्ध , नैसर्गिक आपत्ती , महामारी अशा एक ना अनेक संकटात मदतीचा हात देत समाजभान असलेल्या व्यक्ती पुढे सरसावतात आणि माणुसकीचे दर्शन घडवितात . पिंपरी चिंचवड शहरातील गांधीनगर झोपडपट्टीतील गोरगरिबांना उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून अहोरात्र त्यांच्यासाठी काम करणारे दिपक साबळे हे कोरोना काळातील एकमेव पञकार होते.. त्यांनी पहिल्या लाॅकडाऊनपासून आतापर्यंत गोरगरिबांना घरपोच अन्न तसेच गरिब पञकारांना घरपोच रेशनिंग कीट पुरविण्याचे काम केले..
कोरोनाच्या महामारीत गरजू व गरिबांच्या मदतीला धावून गेले . कोरोना योद्धा म्हणून त्यांनी खरोखरच उल्लेखनीय कार्य केले .यामुळेच त्यांना महाराष्ट्रातून वेगवेगळ्या सामाजिक राजकीय पक्ष आणि पञकार संघांनी आतापर्यंत तेरा पुरस्कार आणि एका ट्राॅफीने सन्मानित करण्यात आले.. यामध्ये Human Rights सामाजिक संघटना, मानवता हिताय सोशल फाउंडेशन, सम्राट सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, पोलीस जाणिव सेवा संघ महाराष्ट्र राज्य, छावा स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य, भिमशक्ति युवा सेना भिमा कोरेगाव, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, महाराष्ट्र युवक काँग्रेस, वेगवान न्यूज, भटके विमुक्त राज्य समन्वयक समिति वंचित बहुजन आघाडी, साप्तहिक पुणे प्रवाह या संस्था संघटनेनी त्यांना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले.
कोरोना महामारीमुळे देशभरात अचानक लॉकडाऊन करून संचारबंदी करण्यात आली परिणामी शहरातील जीवनचक्र ठप्प झाले मात्र ओस पडलेल्या रस्त्यांवर , पदपथांवर सुरकुतलेले , माखलेले अनेक चेहरे भुकेने व्याकूळ झाले होते . अंगात आण राहिला नाही अशा संकटातही कोणीतरी येईल , ही आस बाळगून ते होते . हीच गरज ओळखून पञकार दिपक साबळे यांनी गरजू व गरिबांची भूक भागविली . तसेच धान्य व किराणा आदी १५ साहित्य असलेल्या किटचेदेखील वाटप केले.
शिवाय पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टी, खराळवाडी, कामगारनगर आणि बजरंग नगर या परिसरातील नागरिकांना मोफत कोरोना स्वँपची तपासणी शिबीर दि. 3 जुलै रोजी सामाजिक कार्यकर्त्यासोबत मिळून आयोजित केले होते. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात रिकॉर्ड ब्रेक 300 पेक्षा जास्त लोकांचे मोफत स्वैब टेस्ट, रक्त तपासणी आणि हाय लो बीपी टेस्ट घेण्यात आली. मात्र हे करूनच सामाजिक कार्यकर्ते थांबले नाही तर या तपासणी केलेल्या 300 पैकी ज्यांचा कोरोना पाॅझिटिव्ह रिपोर्ट आला त्यांच्या घरी जाऊन तेथील परिसरात सेनिटायसर फवारणी केली. तसेच रूग्णांना दवाखान्यात दाखल करण्याची जवाबदारी समाजसेवक धनराजसिंग चौधरी, पञकार – दिपक साबळे, सतिश भांडेकर, दिपक म्हेञे,सचिन गुंजाळ, राजन गुंजाळ,चंद्रकांत बोचकूरे, सिध्दार्थ शिरसाठ, विशाल पवळ, अश्विनी पवळ, राजेंद्र साळवे, मनोज गजभार, अजय शेरखाने,आकेश वाव्हळ, विशाल कोळी,राहुल विटकर, नितूल पवार, अमोल बेंद्रे,प्रतिभा बनसोडे, मनिषा केदारी यांनी पार पाडली.