आणि फुलनदेवी या सर्वासमोर जयभीम म्हणाल्या… स्मृतीशेष क्रान्तिकारी फुलन देवी – रामचंद्र आचलकर
फुलनदेवीचा जन्म उत्तर प्रदेशातील गोरहा पुर्व येथे एका दलीत कुटुंबात झाला आई वडील एक भाउ व तीन बहीणी असा त्यांचा परिवार
त्यांचे वडिल खुप गरिब होते परंतु आई मात्र स्वभावाने कडक आणि मजबुत होत्या कुन्हालाही घाबरत नसत परंतु फुलनदेवीला लहान पणापासुन जातियतेची उच निचतेची उतरंड व त्यांच्या जमीनीवर कब्जा करुन नातेवाईकांनी छळणे मारहाण करने ,आशा भयानक परिस्थिती बरोबरच जातीयव्यावस्था,गरिबी,उच निच भेदभाव,स्त्रियांसाठी दिली जानारी हीन वागणुक,यौनशोषण,बालविवाह,आज्ञानता, स्त्रि जन्म म्हटलें की वागणे,बोलणे,चालणे यावर समाजाने घातलेली निरर्थक मापदंड बंधने,बालविवाह,अंज्ञानता,अंधविश्वास, दहेज देणे,घेणे,पैशाच्या लोभापाई कमी वयाच्या मुलिचे वयस्कर पुरुषाबरोबर विवाह रचने( जरठ विवाह)भ्रस्टाचार,करनजे ऊच्च जातीचा गर्व बाळगुन असाहाय हीन,दीन,गरिब जातीवर जबरदस्ती करणे
अशा काही ग्रामिण भागात जिथे न्यायव्यास्था,पोलीस प्रशासनाचा धाक नाही हे सर्व राजस्वत्ता ,गुंडगीरी,बंदुकीच्या धाकावर,खुलेआम,पळवणे,यौनशोषण करणे,नागडे करून खुले आम गावातुन धिंड काढणे. अशा काही अन्याई,सैतानी,पाशवी,ऊच्च वर्णीयांकडुन होणाऱ्या शोषणाला फुलनदेवीला या भयानक छळाला समोरी जाव लागल याचा सामना करावा लागला आणि आन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी एका टोळीचा सहकार घेवुन त्यांच्यात सामिल झाली.
कालंतराने स्वतची व पुर्वीच्या सहकार्याना घेउन टोळी बनवलो नायिका बनली व ज्यानी अत्याचार केले त्यांना धडा शिकवणे व गरिबांना मदत,कठीणप्रसंगी गरिबांच्या मदतीला धावुन जाने, त्यांना मदत करणेत्यामुळे गरीब,असाहय,वंचित,शोषित,पिडित, लोकंमध्ये,समाजामध्ये (संकटाच्या,दु:खाच्या समयी धावुन जाउन मदत करणाऱ्या) रॉबिनहुड वाटायला लागल्या होत्या
आणि अन्याय आत्याचार करणाऱ्यांच्या त्या काही काळ करदन काळ ठरल्या कारण बाबासाहेबांचे शोषित पंडितांसाठीच वाक्य सतत त्यांच्या मनावर कोरले असेल…
!! जुल्म करने वालोसे
जुल्म सहनेवाला ज्यादा गुन्हेगार होता है !!
म्हणुन ज्यांनी त्यांच्यावर अन्यायआत्याचार केले,त्यांचे शोषण केले आत्याचार करणाऱ्यांना संरक्षण दिले आशा २२.ठाकुरांना एका लाईनीत उभे करुन बंदुकीच्या गोळीने मारुन ठार केले
आशा वेळी शासन खडबडुन जागे झाले.
चंबल घाटीतुन त्यांना पकडुन देणारास काही ईनाम जाहीर
काही प्रशासनाकडुन (आत्मसमर्पणाच्या) शरण येण्यास आव्हाण करण्यात आले तेव्हा एका स्त्रिने सततच्या टोळी युद्धात पुरुप टोळीला आव्हान देणे,मागावर,आसणाऱ्या पोलीस रंत्रनेबरोबर सुद्धा लढा. देणे आसे जबर्दस्त लढे दूणे आसे साधे काम नव्हे याला जगात तोड नाही.
आणी म्हणुन आपल्या सहकार्याना देहदंडाची शिक्षा न होता कमित कमि शिक्षा व्हावी या आटीवर ठाम राहुन उत्तर प्रदेश सरकारवर विक्षवास न ठेवता १२ फेब्रुवारी १९८२ रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्राी अर्जुन सिंह यांच्या समोर व हजारो जनता यांच्या उपस्थितीत हजारो पो,प्रशासन फौज फाटा यांच्या उपस्थितित फुलनदेवीने आत्मसमर्पण केले.
पुढे कोर्ट पुढेकेस न चालता ११ वर्ष जेल मध्ये राहील्यानंतर १९९४ मध्ये त्यांची मुलायमसिंह सरकारने सुटका केली
पुढे १९९६ मध्ये फुलनदेवीने महान आशा बौध्द धर्माची दिक्षा घेतली
तसेच पुढे १९९६ मध्ये ईऊत्तर प्रदेश मधील मिर्जापुर लोकसभा मतदार संघामधुन निवडणूक लढवुन विजयी होउन त्या १९९६ ते १९९८ पर्यंत खासदार होत्या
शेवटी त्यांचा जिवन प्रवासाची घोडदौड २५ जुलै २००१ रोजी दिल्लीमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांची हत्या करण्यात आली व तो शत्रुलाही त्यांना बघताच घाम फोडणारा संघर्षाचा झंजावात,शेवटी त्याचा देह धम्माच्या पंच तत्वात विलिन झाला…
हे सर्व लेखन करीत असताना मला सतत त्यांचा पाहीलेला स्मितहस्य मुखातुन निघालेला जयभीम महामानव बोधिसत्व. डॉ,बाबासाहेब आंबेडकर जेथे नेहमी भेट देयाचे आसे ते आहील्याश्रम नाना पेठ पुणे २.त्या पवित्र ठिकाणी ई,७ वी ते १०वी शिक्षण तेथील महत्मा फुले हायस्कुल मध्यील विद्यार्थि असल्यामुळें जाणे येणे आसे
१९९६ मध्ये DCM सोसायटीचे चेअरमन एम.डी.शेवाळे यांनी त्या खासदार आसतांना फुलन देवींचा सत्कार ठेवला होता तेव्हा माझा सहकारी मित्र बबन हीवाळे यांस सह आहील्याश्रम येथे सत्कार समारंभा गेलो आसता जेथे पारकीग होति तेथे फुलनदेवीसाठी फुलांचा गुच्छ घेवुन थांबलो असताना तेव्हढयात फुलनदेवी सह त्यांचे पती ऊम्मेधसिंह सह गाडीतुन उतरले आणि मि लगेच हातातील पुष्पगुच्छ फुलनदेवीला दिला… मी त्यांना जयभिम म्हटल त्यांनी दोन्ही हात जोडून सर्वासमोर जयभिम म्हटले…
हा आयुष्यातला हा क्षण मी कधीही विसरु शकत नाही आणि पुढे त्या फुलनताई स्टेजवर केंव्हा पोहचल्या ते कळालच नाही..!
लेखन,
रामचंद्र. ना.आचलकर
भारतीय बौध्द महासभा
पिं.चिं शहर पुणे