बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी महापालिकेच्या आयुक्तांचा शासनास दिशाभुल करणारा अहवाल;महापौर माई ढोरे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पञ

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समिती सभेत सभापती यांनी दिलेल्या निर्णयावर मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शासनास दिशाभुल करणारा अहवाल दिलेबाबत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार करत पञ पाठविले आहे.

महापौर ढोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या पञात म्हटले आहे की, प्रभाग क्र . २५ मधील दोन विषय स्थायी समिती सभेत नामंजुर करणेत आले होते . त्यानुषंगाने संदर्भ क्र .३ अन्वये मा.कक्ष अधिकारी यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने मा.आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी संदर्भिय ४ अन्वये दिलेला अहवाल खोटा व दिशाभुल करणारा आहे . यावर्षी कोरोना महामारीमुळे उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्यामुळे शहरातील एकुण ३२ प्रभागात विकास कामे करण्यासाठी मर्यादा आल्या आहेत . सर्वच प्रभागातील नगरसदस्यांची विकास कामे करण्यासाठी मागणी असते . कोरोना विषाणूच्या काळात उत्पनात प्रचंड घट झाली असतानाही अशा परिस्थितीत एकाच प्रभागामध्ये ( प्रभाग २५ ) १०० कोटी रुपयापेक्षा जास्त कामे काढली आहे . संदर्भिय १ ब २ ही कामे काँक्रिटीकरणाची असुन ती खुप खर्चिक असल्याने त्याऐवजी डांबरीकरण करण्यास अनेक सदस्यांची सहमती होती .

त्यानुसार क्रॉनिटीकरणाऐवजी डांबरीकरणाची फेर निविदा काढण्यात यावी असा आदेश स्थायी समिती सभापतींनी त्याच सभेमध्ये दिला असताना मा . मनपा आयुक्तांनी नगरविकास विभागाच्या कक्ष अधिकारी यांना दिलेल्या अहवालात कोणतेही कारण न देता सदर विषय दप्सरी दाखल करणेत आल्याची खोटी माहीती देवुन शासनाची दिशाभुल केलेली आहे .तरी सदरील आयुक्तांनी शासनास दिलेला खोटा व दिशाभुल करणारा अहवाल फेटाळण्यात येवुन मा . स्थायी समिती सभापतींनी दिलेला निर्णय कायम करणेत यावा . अशी विनंती देखील महापौर उषा ढोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Share this: