जातीवाचक शिवीगाळ करीत तरूणीवर बलात्कार ;सहा जणांविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी(वास्तव संघर्ष) :लग्नाचे अमिश दाखवून वारंवार तरुणीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला दिघी पोलिसांनी अटक केली .तसेच मी तुझ्याशी लग्न करणार नाही नाही असे म्हणून आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांनी पीडित तरुणीला जातवाचक शिवीगाळ केली . ही घटना फेब्रुवारी 2018 ते 20 सप्टेंबर 2020 या कालावधीमध्ये आळंदी परिसरात घडली.

याप्रकरणी सहा जणांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

रामेश्वर शिवाजी विघ्ने ( वय 28 , रा . ताथवडे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे . बाळू शिवाजी विघ्ने ( रा . लहूळ ता . माजलगाव , जिल्हा बीड ) , गणेश कोल्हे , रामेश्वर याची आई ( नाव माहिती नाही ) , रामेश्वर विघ्ने याची बहीण ( नाव माहिती नाही ) , संकेत कुलकर्णी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी रामेश्वर विघ्ने आणि पीडित तरुणी यांची ओळख उर्से येथील एका कंपनीत काम करीत असताना झाली . आपण आळंदी येथे देवदर्शनाला जाऊ , असे सांगून आरोपीने तरुणीला आळंदी येथील वैभव लॉजवर नेले . मला तू खूप आवडते , मी तुझ्याशीच लग्न करणार आहे , असे सांगून फिर्यादी तरुणीवर वारंवार बलात्कार केला . पीडित तरुणीने आरोपीला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने जातीवाचक शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली . ‘ तुला काय करायचे ते करून घे , मी तुझ्याशी लग्न करणार नाही ‘ , असे म्हणून फिर्यादी तरुणीला ञास दिला. तसेच आरोपींच्या नातेवाईकांनी देखील पीडित तरूणीला जातीवाचक शिवीगाळ केली .अधिक तपास दिघी पोलीस करीत आहेत.

Share this: