हाथरसच्या पीडित दलित मुलीच्या कुटुंबियांची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट

मुंबई (वास्तव संघर्ष) – उत्तर प्रदेशातील हाथरसच्या पीडित बळीत दलित युवतीच्या बुलगडी या गावातील घरी जाऊन तिच्या शोकाकुल परिवाराची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली.

या परिवाराला रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सांगून या परिवाराला पोलीस संरक्षण देणार असल्याचे ना. रामदास आठवले यांनी सांगितले.रिपब्लिकन पक्षातर्फे सांत्वनपर 5 लाख रुपये आर्थिक मदत देणार असल्याचे सांगून पीडित बळीत दलित युवतीच्या परिवाराला न्याय मिळवून देण्याचा लढाईत रिपब्लिकन पक्ष या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले आहे.

Share this: