पिंपरीतील अनुग्रह सोसायटीत भर दिवसा घरफोडी ; चार लाख 64 हजारांचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी केली लंपास

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरीतील अनुग्रह सोसायटीत भर दिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी चार लाख 64 हजारांचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे . ही घटना शुक्रवारी ( दि . 9 ) दुपारी दीड ते साडेपाच या वेळेत म्हाडा संत तुकाराम नगर , मोरवाडी येथे घडली .

सॅमसंग बेजामीन शेफर्ड ( वय 55 , रा.संत तुकारामनगर , मोरवाडी , पिंपरी ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

त्यानुसार पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी शेफर्ड यांचे घर शुक्रवारी दुपारी दीड ते साडेपाच वाजताच्या कालावधीत कुलूप लाऊन बंद होते . दरम्यानच्या कालावधीत दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या घराचा सेफ्टी दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला . बेडरूममधील कपाटातून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 4 लाख 64 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला . अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत .

Share this: