काळेवाडीतील डीमार्ट समोर महिलेचा विनयभंग ;वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाकड (वास्तव संघर्ष) काळेवाडीतील डीमार्ट समोर एका महिलेला रिक्षातून खाली उतरून तीचा हात पकडून जवळ ओढुन एकाने महिलेचा विनयभंग केला . ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली असून आरोपी विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिडीत 26 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

निलेश उर्फ खंडु रघुनाथ चव्हाण( वय २७ वर्षे रा . सँडी बाबा बिल्डी . चौक नवी सांगवी पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी महिला हे रहाते घरुन चिंचवड येथे रिक्षाने जात असताना ते काळेवाडीतील डीमार्ट समोर येथे आल्या असता , त्यांच्या रिक्षाच्या पाठीमागून आरोपी निलेश चव्हाण हा मोटार सायकल वरुन आला व फिर्यादी महिलेस रिक्षा थांबव असे म्हणाला, त्यानंतर फिर्यादी महिलेने रिक्षा थांबवुन रिक्षा मधुन खाली उतरली असता , आरोपी निलेश याने फिर्यादी महिलेला तु मला भेटत का नाहीस व माझे फोन का उचलत नाही . असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरवात केली व फिर्यादी महिला यांची इच्छा नसताना त्यांचा हात पकडला व जवळ ओढुन त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यामुळे आरोपी निलेश विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this: