मिलिंद एकबोटे हे निर्दोष असून त्यांना कोरेगाव भीमा दंगलीच्या प्रकरणात गोवण्यात आले – आमदार सुनील कांबळे

समस्त हिंदू आघाडीच्या वतिने धम्मचक्रप्रवर्तनदिन हा दिवस राष्ट्रीय एकात्मतादिन म्हणून साजरा

पुणे (वास्तव संघर्ष) : १४ ऑक्टोबर १९५६ ला विजया दशमीच्या दिवशी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन संपूर्ण देशात सामाजिक क्रांतीची मशाल पेटविली तो दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन…!

धम्मचक्रप्रवर्तनदिन हा दिवस राष्ट्रीय एकात्मतादिन म्हणुन साजरा करण्याची समस्त हिंदू आघाडीची अनेक वर्षांची प्रथा आहे. यंदा कोरोनाच्या वातावरणात समस्त हिंदू आघाडीच्या शंभर कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम होणार आहे पुण्यात संपन्न केला. गेली सहा वर्षे समस्त हिंदू आघाडी “राष्ट्रीय एकात्मता दिन” साजरा करीत आहे.भारतमातेचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे यावेळी पुजन करण्यात आले

यावेळी आमदार सुनील कांबळे, भाजयुमो चे ॲड.मा. प्रदीप गावडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम, मा. नगरसेवक शेखर ओव्हाळ आणि समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना आमदार सुनील कांबळे म्हणाले, समस्त हिंदू आघाडीही सामाजिक समता बळकट करण्याचे काम करित आहे ते खूप प्रशसनिय आहे. मिलिंद एकबोटे हे निर्दोष असून राजकीय स्वार्थासाठी त्यांना कोरेगाव भीमा दंगलीच्या प्रकरणात गोवण्यात आले. असेही त्यांनी सांगितले.

ॲड. प्रदीप गावडे म्हणाले ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म नाकारून भारताच्या एकात्मतेचे रक्षण केले आहे ‘ कोणत्याही ठिकाणी दलितांवर अन्याय झाला तर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम दलितांच्या मदतीसाठी धावून आले पाहिजे असे देखील यावेळी गावडे म्हणाले

अमित मेश्राम यांनी समस्त हिंदू आघाडीच्या कार्याचा आणि मिलिंदभाऊ यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

या प्रसंगी सर्वश्री विशाल पवार, तृनाल नुले, कुमार उर्फ मायकल पंजलर, रमेश भंडारी, कुणाल नवगिरे या कार्यकर्त्यांनी ‘कोविड योद्धा’ म्हणून जे कार्य केले त्याबद्दल आमदार सुनील कांबळे यांनी त्यांचा सत्कार केला.

कार्यक्रमाचा समारोप करताना ‘ डॉ.बाबासाहेबांच्या बरोबर आज राष्ट्रसंत गाडगेबाबांचे सुद्धा स्मरण केले पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार बाबासाहेबांनी भारतीय परंपरेला अनुकूल असलेल्या बौध्द धर्माचा स्वीकार केला, त्यामुळे देशाचे पुन्हा तुकडे होण्याचा प्रसंग टळला.’ असे मिलिंद एकबोटे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रीतम गिते आणि श्री. कुणाल कांबळे यांनी केले. आभार प्रदर्शन कु. लोकेश कोंढरे यांनी केले.

Share this: