रावण टोळीशी संबंधित गुंडाच्या खुन प्रकरणी चार आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) औंध परिसरात दहशत असलेला व कुख्यात रावण टोळीशी संबंधित गुंड  क्षितिज लक्ष्मीकांत  वैरागर याला भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी चर्तुश्रृगी पोलीस ठाणे हद्दित चार गुंडांनी खून केला होता.  अवघ्या ५ तासात पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक या केली आहे.

आकाश लक्ष्मीकांत वैरागर (वय- २३ वर्षे रा- आंबेडकर कॉलनी जवळ , औंधगाव , पुणे  ) शुभम अनिल घाडगे ( वय- २२ वर्षे , रा- भगत चाळ , औंधगाव , पुणे  ) शिवानंद बाळासाहेब पवार ( वय- २३ वर्षे , रा- कस्तुरबा गांधी वसाहात , औंधगाव , पुणे  ) पुष्कर बाळासाहेब पवार (वय -२३ वर्षे , रा- माऊली अंगण बिल्डींग , औंधगाव , पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दि . १ ९ / १० / २०२० रोजी सायंकाळी चर्तुश्रृगी पोलीस ठाणे  हद्दित औंध परिसरात दहशत असलेला व कुख्यात रावण टोळीशी संबंधित गुंड  क्षितिज लक्ष्मीकांत  वैरागर (रा – औंध) याचा सराईत गुन्हेगार नामे अनिकेत दिक्षित , रा- पोलीस लाईन औंध याने भरचौकात कु-हाडीने वार करुन निघून खुन केला होता .

सदर बाबत चर्तुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येवुन आरोपीस अटक करण्यात आली होती . यातील मयत इसम हा गुन्हेगारी पाश्वभुमीचा व कुख्यात रावण टोळीशी संबंधित असल्याने सदर प्रकरणाचे पुणे शहर आयुक्तालय व पिंपरी चिंचवड आयुक्तालय परिसरात हिंसक पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने गुन्हे शाखेचे पोलीस उप – आयुक्त  सुधिर हिरेमठ यांनी संपुर्ण  गुन्हेशाखेस सतर्क राहण्याचे आदेश दिले होते . त्या अनुशंगाने दि .२० / १० / २०२० रोजी वरिष्ठ पोलीस  निरीक्षक मोहन शिंदे  हे आपल्या पथकासह युनिट -४ चे हद्दित सतर्कपणे पेट्रोलिंग करत असताना खूनातील ०४ हल्लेखोर हे पिंपळे निलख नदीपात्रा जवळ लपुन बसले आहेत अशी माहिती मिळताच त्यांना अवघ्या पाच तासांच्या आत अटक करण्यात आली आहे.

  सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त  कृष्णा प्रकाश , अपर पोलीस  आयुक्त  रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त गुन्हे मा सुधीर हिरेमठ , सहा.पोलीस आयुक्त, राजाराम पाटील यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा , युनिट -४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन दा . शिंदे , सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख , स.पो.फौ. धर्मराज आवटे , पोहवा / प्रविण दळे , संजय गवारे , नारायण जाधव , दादाभाऊ पवार , अदिनाथ मिसाळ , पोना / संतोष असवले , तुषार शेटे लक्ष्मण आढारी , मो . गौस नदाफ , वासुदेव मुंडे , पोशि / शावरसिध्द पांढरे , सुनिल गुट्टे , प्रशांत सैद , तुषार काळे , सुरेश जायभाये , गोंविद चव्हाण , अजिनाथ ओंबासे , धनाजी शिंदे , सुखदेव गावंडे , नागेश माळी व राजेंद्र शेटे तांत्रिक विश्लेषन विभाग गुन्हे शाखा यांनी केली आहे .

Share this: