गांधीनगर येथे महिलेचा विनयभंग करून तीच्या पतीला जीवे मारण्याची धमकी;पिंपरी पोलिसांनी आरोपीला केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरीतील गांधीनगर येथे एका महिलेचा विनयभंग करून तसेच महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महिंद्रा अॅन्थिया सोसायटी समोर , गांधीनगर , पिंपरी येथे घडली आहे. आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पिडीत 32 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बबन अजिनाथ ओव्हाळ (वय ५२ रा . महिंद्रा अॅन्थिया सोसायटी समोर , गांधीनगर , पिंपरी , पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महिंद्रा अॅन्थिया सोसायटी समोर , गांधीनगर येथे फिर्यादी महिला व तीचे पती घरी जात असताना त्यांचे समोरुन त्यांचे भागात राहणारा आरोपी बबन हा समोरुन त्याचे गाडीवर आला . तो गाडीवर येत असताना फिर्यादी यांचेकडे एक टक बघत फिर्यादी यांचे समोर आला .

फिर्यादी महिलेसमोर थोडावेळ थांबून तो फिर्यादी महिलेकडे एकटक बघत त्यांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने गाणे म्हणत होता . त्यावेळी सदरचा प्रकार फिर्यादी महिलेच्या पतीने बघितल्यावर फिर्यादी महिलेच्या पतीने आरोपी बबन यास आवाज दिला . परंतु तो लगेच त्याचे गाडीवर तेथून निघून गेला . त्यानंतर फिर्यादी महिलेच्या पतीने तु माझ्या पत्नीकडे असे का बघत होता असे म्हणल्याने आरोपी बबन यांने फिर्यादी महिलेच्या पतीला शिवीगाळ करुन मी तुला मारुन टाकीन अशी धमकी दिली. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Share this: