राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा अभिनव उपक्रम ;पणत्या विक्री करून गरिब आणि बेघर मुलांसाठी करणार दिवाळी साजरी

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस यांच्या वतीने एक दिवा उद्याच्या उमेदीचा या अभिनव उपक्रमाचे आयोजन युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप यांनी ऐआॅन इव्हेंट अॅन्ड हाॅस्पिटलिटी, युथ द पाॅवर टु चेंज आणि मदत प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून व सोनम पाटिल यांच्या विशेष सहकार्याने घेण्यात आले.

यावेळी वर्षा जगताप म्हणाल्या ‘या उपक्रमाअंतर्गत दिवाळीत घरोघरी लावण्यात येणाऱ्या पणत्या रंगवून त्यावर सजावट करून त्या बाजारात विक्री करून येणारा जो निधी आहे तो गरिब,गरजू व बेघर कुटुंबातील मुलांसाठी सोनेरी दिवाळी साजरी करण्याचा मानस ठेवून हा उपक्रम करण्यात आल्याचे देखील जगताप यांनी सांगितले .

या कार्यक्रमासाठी ऋतुजा बिराजदार, गीता मोरे,नेहा पडवळ,हीना अत्तार,मेघना जगताप,शलाका बनकर,स्नेहल लायगुडे,अश्विनी विशाल पवळ, सायली निकम, सारिका ढमे,फातिमा अन्सारी, रविराज काळे, राजश्री आहिरे यांच्या सहभागाने केला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती वीरेंद्र बहल, पल्लवी पांढरे, मनिषा गटकळ, यांची होती.

Share this: