बातम्यामहाराष्ट्र

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा राज्यसरकारचा निर्णय हे उशिरा सुचलेले शहाणपण – रामदास आठवले

मुंबई (वास्तव संघर्ष) -महाराष्ट्रात सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत या साठी रिपब्लिकन पक्षाने राज्यभर आंदोलन केले होते. उशिरा का होईना पण चांगला निर्णय घेऊन राज्य सरकार ने सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा राज्य सरकार चा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

कोरोना चा प्रसार होऊ याची खबरदारी घेऊन सर्व नियम पाळून सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी होती. त्यासाठी रिपाइं ने राज्यभर आंदोलन केले. दिवाळी पाडव्या पासून सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय हे राज्य सरकार ला उशिरा सुचलेले शहाणपण असले तरी या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे ना रामदास आठवले म्हणाले.

लोकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून प्रेसकार्डधारक पत्रकारांचा समावेश करण्यात आला मात्र अत्यावश्यक सेवा म्हणून रेल्वे प्रवासात प्रेसकार्ड धारक पत्रकारांचा ही राज्य सरकार ने समावेश करावा या मागणी चे पत्र आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले असुन त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगत अधिस्वीकृतीधारक आणि प्रेसकार्ड धारक पत्रकार असा भेद करून श्रमिक पत्रकार कॅमेरामन यांच्यावर होणारा अन्याय राज्य सरकार ने दूर करावा अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

Share this: