जुन्या भांडणाचा राग मनात धरून पती आणि पत्नीवर घरात घुसून वार ;पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) : जुन्या भांडणाचा राग मनात धरुन चार आरोपींनी घरात घुसून पती आणि पत्नी दोघांवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. ही घटना चिंचवड येथील रामनगर कुंभारगल्ली येथे बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली आहे.

आनंद ऊर्फ बालाजी भाऊराव दिवटे( वय- ४० वर्षे रा , रामनगर समोर , कुंभारगल्ली , दत्तनगर , चिचंवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संतोष पवार( वय ४२ वर्षे रा . कुंभारगल्ली दत्तनगर चिंचवड ) सागर राऊत( वय ३० वर्षे ) सागर कोकरे( वय २ ९ वर्षे रा . सदर ) सुरज राऊत (वय २५ वर्षे रा . सर्व राहणार दत्तनगर चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास रामनगर कुंभारगल्ली यातील आरोपींनी मागील भांडणाचा राग मनात धरुन आपसांत संगणमत करुन फिर्यादी आनंद ऊर्फ बालाजी दिवटे यांच्या घरावर दगडफेक करुन आरोपी सागर कोकरे आणि सुरज राऊत हे फिर्यादी आनंद ऊर्फ बालाजी दिवटे यांचे घरात घुसुन शिवीगाळ करुन घरातील सामानाची तोडफोड करत नुकसान केले . तसेच फिर्यादी आनंद ऊर्फ बालाजी दिवटे यांचे डाव्या पायाचे मांडीमध्ये धारधार चाकुने भोसकून जखमी केले . तसेच फिर्यादी यांची पत्नी मीना आनंद दिवटे हिचे केस आरोपी सागर राऊत याने पकडुन आरोपी संतोष पवार याने आज तुला जिवंत सोडत नाही असे म्हणुन फिर्यादी आनंद ऊर्फ बालाजी दिवटे यांच्या पत्नीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्या पोटामध्ये चाकु घुसवुन तिला गंभीर जखमी केले.अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Share this: