लेख-कविता

मोबाईल सिम कार्ड विकणारा ते गायक.. पिंपरी चिंचवड शहरातील या गायकाचा थक्क करणारा प्रवास

दिपक साबळे…! ✍️

पुणे हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते, त्याच पुण्यातील छोटे पुणे म्हणून ज्या शहराने नावलौकिक प्राप्त केले ते पिंपरी चिंचवड शहर होय. याच पिंपरी चिंचवड शहरात अनेक गुणी कलाकार उद्यास आले. त्यातीलच एक नाव म्हणजे गायक मुन्ना भालेराव.. गाण्यांची कुठलीही पार्श्वभूमी नसताना, गाण्यांचा कुठलाही क्लास नाही की गाणं शिकवणारा कुणी गुरू नाही.. माञ उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर मोबाईलचे विविध सिम कार्ड विकून एक आवड म्हणून जोपासलेला हा गाण्याचा छंद त्याला एक प्रसिद्ध गायक म्हणून उदयास आणतो..

बनव मला खजिनदार, नवरी झाली गुल, धाऊन ये मोरया, पळवुन लावला बाजीरावाला, जय भीम वाल्यांच्या वाटला जायाच नाय, बघ ना भावा पाखरू वाढीव दिसतया, असे एकाहून एक गाण्याला गायक मुन्ना भालेराव यांनी आपल्या आवाजाने संगितबध्द केले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील देहूरोड येथे एका गरीब कुटुंबात जन्म झालेल्या मुन्ना चा प्रवास स्वप्नांतून सुरु झाला. आयुष्याचे चटके खात असताना शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे पाहून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे गायले. सिम कार्ड विकून हाताशी येणारे तुटपुंजे पैसे हे गाणं बनवण्यासाठी खर्च केले..इतकंच नव्हे तर वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेऊन गाण्यासाठी वेळ दिला.. एका सर्वसाधारण घरात राहणा-या गायक मुन्ना भालेराव यांनी घरातच रियाज करण्यास सुरुवात केली. नवीन गायकांचा सोशलमिडीया हा प्रमुख फ्लॅटफाॅर्म असतो. त्याचा वापर करून गायक मुन्ना भालेराव यांनी आपल्या गाण्यांना लोकांपर्यंत पोहोचवले..

फेसबुक वर आपल्या गाण्याचे व्हिडीओ त्याने शेअर करायला सुरवात केली. अवघ्या काही दिवसात मुन्नाच्या आवाजाने सोशल मिडियावर एक वादळ आलं. त्यानंतर त्याने आपला मोर्चा यु ट्यूब वर वळवला. एका पाठोपाठ एक गाण्यांचे मुन्नाचे व्हिडीओ कमालीचे लोकप्रिय झाले. याच गाण्याला रातोरात यु ट्यूब आणि जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध केलं. आजच्या घडीला गायक मुन्ना भालेराव हे यु ट्यूब वरील चॅनेल आणि फेसबुकवरील चॅनल सोशलमिडीयावर धुमाकूळ घालत आहे..

खालील लिंक ही गायक मुन्ना भालेराव यांच्या युट्यूब चॅनलची आहे…

Share this: