लेख-कविता

नवाेदित वकीलांच्या समस्या काेण साेडविणार ?झोपेचे सोंग घेण्या-यांनो जागे व्हा

प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती आजमितीस covid-१९ मुळे संकटात आहे.
त्याचप्रमाणे वकील व्यवसायातील अनेक सिनियर व ज्युनियर देखील आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. त्याचप्रमाणे नवोदित जे नुकतेच (final year LLB complete झालेले) हे व ह्यांचे कुटुंबीय देखील आजमितीस आर्थिक संकटाशी सामोरे जात आहेत. त्यामुळे हे रईस ज्यादे बार कौन्सिलर (जन्मतः सोन्याचा चम्मच तोंडात घेऊन चुकून हया जन्माला आलेले) यांना हया सर्वसामान्य वकिलांच्या समस्यांची जाण कशी असणार ?

सर्वसामान्य व्यक्तीला कुठल्या कुठल्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते व कश्या पद्धतीने तडजोड करून एक एक समस्या सोडवाव्या लागतात हे यांना कसे कळणार ? हया सरकारला हया नवोदित वकिलांकडून पंधरा हजार रुपये रेजिस्ट्रेशन फी आकारणीबाबत अनेक वकिलांनी तक्रार नोंदवल्या त्यात युवा नेते अ‍ॅड-अजिंक्य गीते, अभिजित गोसावी – नाशिक यांनी भ्रष्टाचाराची चरणसीमा गाठणारे जयंत जायभावे यांना पत्र लिहून युवा वकिलांची समस्या सांगितली याप्रमाणेच इतरांनीही BCMG च्या चेअरमन व अ‍ॅडव्होकेट जनलर यांच्याकडे तक्रारी नोंदवल्यात.

जसे की अ‍ॅड- उल्हास नाईक – मुंबई तसेच अ‍ॅड- जोशी – बोरिवली, मुंबई हे व इतर अनेक महाराष्ट्रातील वकिलांनी, तक्रारी अर्ज पाठवून देखील ह्या बार कौन्सिलर लोकांनी काहीही गांभीर्याने घेतलेले दिसत नाही.कारण हे ढोंगी आहेत, खरोखर झोपलेल्या व्यक्तीला झोपेतून उठवणे सोपे असते. पण झोपेचे ढोंग करणारे व्यक्तीला जागे करणे अवघड असते. अशी यांची स्थिती आहे.

जगदीश का. काशिकर

Share this: