अपहरण करणा-या आरोपीच्या बाजूने उभी राहिली तरुणी ;या कारणावरून न्यायालयात घेतला ‘युटर्न’

पिंपरी(वास्तव संघर्ष) : भर दिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून चिंचवडील एका आॅफिमध्ये काम करणाऱ्या तरूणीचे अपहरण केल्याबाबत मंगळवारी (दि. १९) रोजी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता . पोलिसांनी अगदी शिताफीने या अपहरणकर्त्यां आरोपी अटक केली होती. मात्र अपहरण झालेल्या तरुणीने न्यायालयात स्वतः हजर राहून शपथपत्र सादर केले आहे . त्यात तीने म्हटले आहे माझे अपहरण नसून मी माझ्या मर्जीने तरुणासोबत गेले आहे .

शंतनू चिंचवडे (रा. चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास तरुणी काम करीत असलेल्या ठिकाणी शंतनू गेला. पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण केले, असा गुन्हा शंतनूवर दाखल करण्यात आला होता

याबाबत तरुणीच्या वडिलांनी चिंचवड पोलिस ठाण्यात मंगळवारी ( ता . 19 ) फिर्याद दिली आहे . मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास चिंचवडमधील एका आॅफिमध्ये घुसून एका तरुणाने 23 वर्षीय तरुणीचा पिस्तुलाच्या धाकाने अपहरण केले . तरुणाचे तरुणीसोबत मैत्रीचे संबंध असून , तरुणी त्याला नकार देत असल्याने त्याने हे अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

त्यानंतर पोलिसांनी अपहरणकर्त्यां तरुणाला ताब्यात घेतले . त्याला न्यायालयात हजर केले . त्या तरुणीने न्यायालयात स्वत हजर राहून शपथपत्र सादर केले . त्यात तिने म्हटले आहे की , हे अपहरण नसून मी माझ्या मर्जीने त्या तरुणासोबत गेले . तरुणासोबत आपले प्रेमसंबंध असून , त्याला घरच्यांचा विरोध होता . त्यामुळे आपण त्याच्यासोबत गेल्याचे शपथपत्रात म्हटले आहे .

Share this: