“जागतिक महिला दिनानिमित्त”दिघी चऱ्होलीतील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

भोसरी (वास्तव संघर्ष) :दिघी पोलीस स्टेशन येथे २४ तास नागरिकांच्या रक्षणासाठी कायदाचे पालन करत दिवस रात्र कार्य करणाऱ्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस कर्मचारी साडी श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच संबंधित पोलीस स्टेशनच्या वतीनेही महिला दक्षता कमिटीवर कार्य करणाऱ्या भारती चव्हाण, अश्विनी कांबळे, चंदा सुरवाडे, कांचन जाधव , व इतर महिलांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी दिघी पोलीस स्टेशन वरीष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव , पोलीस महिला तसेच दिघी दक्षता कमिटीच्या महिला उपस्थित होत्या. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रम चे आयोजन नगरसेविका सुवर्णा भुर्डे, अ‍ॅड. सोनाली घाडगे, अ‍ॅड. राजश्री माने, गायत्री तळेकर व युवा नेते केशव वाघमारे यांनी केले होते. तसेच आभार प्रदर्शन वरीष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांनी केले

Share this: