बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

राष्ट्रवादी काॅंग्रेसने कार्यकर्त्यांना पाडले संभ्रमात ; सुलक्षणा शिलवंत की आण्णा बनसोडे पिंपरीत नक्की कोण उमेदवार

पिंपरी(वास्तव संघर्ष) विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी माजी आमदार अण्णा बनसोडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, सुलक्षणा धर-शिलवंत आणि बनसोडे या दोघांनाही पक्षाने ‘एबी फॉर्म’ दिले आहेत. त्यामुळे दोघांपैकी एकजणाला अर्ज माघारी घ्यायला लावून पक्षश्रेष्ठी संभाव्य बंडखोरी रोखण्याच्या मनस्थितीत आहेत.माञ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे कार्यकर्ते संभ्रमित असून नेमके आम्ही कोणाचे काम करायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे.

पिंपरी विधानसभा निवडणुकीत तीव्र इच्छुक असलेले माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी पक्षश्रेष्ठी वर पञकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली होती . यावेळी निवडणुकीत आपण अपक्ष विजय मिळवून दाखवू, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला . त्यामुळे ओव्हाळ बंडखोरी करणार हे निश्चित मानले जात आहे.

दरम्यान आण्णा बनसोडे यांनी आज राष्ट्रवादी – काँग्रेस आघाडीच्या वतीने पिंपरी मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला असून सुलक्षणा शिलवंत यांनी देखील राष्ट्रवादीकडून अर्ज भरला आहे. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीपर्यंत राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार ‘फायनल’ असेल, हे गुलदस्त्यात राहणार आहे.

Share this: