बातम्या

नारी आहे म्हणून समाज आहे, नारी आहे म्हणून हे विश्व आहे – ममताताई सिंधुताई सपकाळ

शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आदर्श नारी पुरस्कार सोहळा संपन्न

पिंपरी चिंचवड ,प्रतिनिधी :नारी आहे म्हणून समाज आहे नारी आहे म्हणून देश आहे व नारी आहे म्हणूनच विश्व आहे असे प्रतिपादन ममता ताई सिंधुताई सपकाळ यांनी केले आहे.पिंपरी चिंचवड शहरात शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आदर्श नारी पुरस्कार सन्मान सोहळ्या प्रसंगी त्या बोलत होत्या.

महिलांनी स्वतःला कधी कमी लेखू नये, निसर्गाने निर्मितीचे दान महिलांच्या पदरी दिल्या आहे. आपण जे काही काम करत आहात त्या कामात स्वतःला झोकून द्या म्हणजे आपल्याला यश नक्कीच मिळेल, पुरुषांची मक्तेदारी व स्पर्धा असलेल्या पत्रकारिता क्षेत्रात मागील आठ वर्षापासून एक महिला पत्रकार शबनम सय्यद या उल्लेखनीय कार्य करीत टिकून आहेत यातच शबनम सय्यद यांचे यश आहे असेही ममता ताई सिंधुताई सपकाळ यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड शहरात शबनम न्यूज मीडिया ग्रुप संस्थेच्या वतीने आदर्श नारी पुरस्कार सोहळा संपन्न झाला पिंपरी चिंचवड शहरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा आदर्श नारी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला सदर पुरस्कार अनाथांची माय पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्याचा वसा पुढे नेत असणाऱ्या ममता ताई सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.सदर कार्यक्रम प्रसंगी विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांच्या सह पिंपरी चिंचवड शहराच्या माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे, सरिता साने सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेच्या महिला शहराध्यक्ष सरिता ताई साने यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिलांचा प्रत्येक दिवस हा महिला दिन -आमदार उमा खापरे

आदर्श नारी पुरस्कार सोहळ्याप्रसंगी विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की महिलांसाठी प्रत्येक दिवस हा महिला दिन असतो. महिलांमध्ये जे सद्गुण असतात ते पुरुषांमध्ये असत नाही, महिला दिवसभर आपले स्वतःचे मुलं बाळ सांभाळून अनेक कामे करतात ती कामे पुरुष मंडळी करू शकत नाही. महिला दिन हा वर्षातून एकदाच साजरा न करता आयुष्यातील प्रत्येक दिवस हा महिला दिन म्हणून साजरा होत असतो. समाजात चांगल्या काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. ज्या महिलांना पुरस्कार प्राप्त झालेत त्या महिलांनी आपल्याबरोबर दुसऱ्याही महिलांना संधी द्यावी असे आमदार उमा खापरे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

या कार्यक्रमात माजी उपमहापौर शैलजाताई मोरे माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांच्यासह सरिता ताई साने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या पुरस्कार सोहळ्या प्रसंगी आदर्श नारी पुरस्कार माजी नगरसेविका वैशाली घोडेकर, उन्नती फाउंडेशनच्या संचालिका सौ.कुंदाताई भिसे ,केंब्रिज स्कूलच्या संचालिका सौ. शितल वर्णेकर, पुण्याच्या दैनिक केसरीच्या पत्रकार सौ.कल्पना खरे – साठे, माजी नगरसेविका सौ.स्वाती माई काटे, सामाजिक कार्यकर्त्या सौ.ऐश्वर्या राजेंद्र सरस, सामाजिक कार्यकर्त्या सौ.गीता प्रवीण महेंद्रू , सामाजिक कार्यकर्त्यां सौ.हिना महबूब मुलानी, सौ कांचन जावळे, सौ शशिकला सपकाळ ,सौ. चैताली भोईर , क्रीडा प्रशिक्षक सौ. श्रद्धा शेलार व सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुगंधा पाषाणकर यांना ममता ताई सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

तसेच या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी सक्षम महिला बचत गटांचा ही सन्मान करण्यात आला यामध्ये उन्नती शक्ती महिला बचत गट, उन्नती शीतला महिला बचत गट, विनायक महिला बचत गट, प्रथमेश महिला बचत गट, चिंतामणी महिला बचत गट ,पवना महिला बचत गट, संस्कृती महिला बचत गट , रिद्धी सिद्धी महिला बचत गट , सखी महिला बचत गट , स्त्री आधार केंद्र महिला बचत गट या बचत गटांचा सन्मान ,सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारार्थी मध्ये पुरस्काराला उत्तर देताना अनेक पुरस्कारार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये स सौ.गीता प्रवीण महेंद्रू, सौ हिना महबूब मुलानी, पत्रकार सौ कल्पना खरे साठे, यांनी आपले मनोगत व्यक्त करत शबनम न्यूज वृत्तसंस्थेचे आभार व्यक्त केले.याप्रसंगी रितू ताई कांबळे, दुर्गा भोर, शैलाताई पगारे, करिश्मा ताई बारणे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवर यांच्यासह समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक महिला सामाजिक कार्यकर्त्या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी राजकारणात सक्रिय असलेल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रम प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत शबनम न्यूज च्या संपादिका शबनम सय्यद यांनी केले.सदर कार्यक्रमात प्रस्तावना शबनम न्यूज च्या सहसंपादिका गजाला सय्यद यांनी मांडलीकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक व चित्रपट अभिनेते संदीप साकोरे यांनी केले.तर सदर पुरस्कार सोहळ्यात शबनम न्यूज च्या प्रतिनिधी आसिया सय्यद यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Share this: