क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात गॅंगवार; भर चौकात केला खून


पिंपरी(वास्तव संघर्ष ) : पिंपरी चिंचवड शहरात गॅंगवार पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. अशाच एका पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा भर चौकात गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) रात्री पावणेदहा वाजता घडली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील बजरंग शिस्तारे (वय 39, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिपक कदम असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

अमन गिल आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी सांगवी मधील माहेश्वरी चौक येथील इंद्रप्रस्थ सोसायटी समोरील मुख्य रस्त्यावर दिपक कदम याच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या. दिपकच्या चेहऱ्यावर दोन गोळ्या लागल्या.

त्याला तात्काळ उपचारासाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.दिपक हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.मात्र परस्पर दुश्मनी मिटवण्याच्या नादात शहरातील कायदा सुवस्थेवर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत

Share this: