‘मोफत शिलाई मशीन योजना’ म्हणजे अफवा..! वाचा सविस्तर
पुणे(वास्तव संघर्ष): केंद्र सरकारने मोफत शिलाई मशीन योजना सुरु केली आहे.या योजनेच्या माध्यमातून गरीब घरातील स्त्रीयांना मोफत शिलाई मशीन मिळणार आहे.स्त्रियांना कपडे शिवून पैसे मिळतील त्यामुळे स्त्रियांना आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे . सदर योजनेचा लाभ हा ग्रामीण भागातील गरीब घरातील स्त्रियांबरोबर शहरी भागातील गरीब स्त्रियांना देखील होणार आहे.असे म्हणून महाराष्ट्रासह पिॅपरी चिंचवड पुण्यामध्ये सर्रास गोरगरीब महिला फॅार्म भरत आहे.यामुळे स्थानिक महानगरपालिकेला त्रास सहन करावा लागत आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. या योजनेत १८ पगड जातीच्या नागरिकांना पारंपारिक व्यवसाय अधिक बळकट करण्यासाठी कर्जही देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले. परंतु मोफत शिलाई मशीन मिळणार ही अफवा कोणीतरी पसरवल्याने पिॅपरी चिंचवड शहरातील महिलांचे लोंढेच्या लोंढे महाईसेवा केंद्रात फॅार्म भरत आहेत.
मोफत शिलाई मशीन मिळणार आहे, असे म्हणून महिला अर्ज करत आहेत. याबाबत वास्तव संघर्षने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीतील अधिका-यांना विचारले असता त्यांनी सांगितले प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्रातून राबविण्यात येत आहे.
यापूर्वी केंद्र, राज्य शासनाच्या योजना याच विभागामार्फत सुरू आहेत. कोरोनानंतर हातगाडीवर साहित्य विक्रेत्यांना १० ते ५० हजार रुपयांपर्यंत स्वनिधी या उपक्रमांतर्गत कर्ज देण्यात आले. त्याच पद्धतीने ही योजना केंद्राने आणली आहे.मात्र मोफत शिलाई मशीन दिली जात नाही .महिलांनी अशा अफवांना बळी पडू नये.