भाजपा आमदार महेश लांडगेंविरूद्ध गुन्हा दाखल करा; पोलीस आयुक्तांकडे मागणी
भोसरी (वास्तव संघर्ष): भाजपा आमदार महेश लांडगे यांच्याविरूद्ध कायदेशिर पद्धतीने जातीय धार्मिक तसेच भावनिक तेढ निर्माण करून आपला सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणे तसेच धार्मीक भावनांचे हनन करण्याचे प्रकार केल्या बाबत गुन्हा दाखल करा याबाबत सामाजिक कार्यकर्त सचिन शिंदे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताकडे निवेदन दिले आहे.
सचिन शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे,प्रसिध्दीच्या हव्यासापोटी भाजप आमदार महेश लांडगे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवर आमदारांनी चक्क स्वतःची सही/नावाचा फॉट छापला आहे त्यामुळे आंबेडकरी कार्यकत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.भाजप आमदार महेश लांडगे यांनी भारतीय संविधान भवनाची जाहिरात करत असताना अॅटो रिक्षावर ‘विचार लोकशाहीचा, अभिमान संविधानाचा’ अशी टॅगलाईन टाकून एका बाजूला संविधान निमार्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला स्वताचा फोटो छापला आहे. असे असताना आमदार यांनी स्वतःच्या फोटोवर सही न करता बाबासाहेब यांच्या फोटोवर स्वतःची सही छापली आहे. असे अनेक रिक्षा पिपरी चिंचवड शहरात त्यांनी फिरवले आहेत. त्यातीलच एक रिक्षाचा फोटो सोशलमिडीयावर वायरल झाला आहे.
दरम्यान, मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात उभारण्यात येणाऱ्या १०० फूट उंचीच्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या काही भागांना तडे गेल्याचे समोर आले होते आणि आता संविधान निमार्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवर आमदारांनी चक्क स्वतःची सही केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार असलेल्या भोसरी विधासभेत या दोन महापुरूषांचा अवमान करण्याचा प्रकार झाला आहे.
तरी सदर प्रकार हा भाजपा आमदार महेश लांडगे यांनी जाणुन बुजून केला असो किंवा नसो सदरचा प्रकार हा त्यांच्या मार्फत घटीत झाला असून, बॅनर छापते वेळेस अथवा ते प्रसिद्धी वेळेस भाजपा आमदार महेश लांडगे यांनी ते प्रथमदर्शनी पाहुन ते प्रसिद्धीस होकार दिलेला असतो व अशा प्रकारे बॅनेर छापण्यात येते व अशा स्थितीत सदर बाब ही महेश लांडगे यांना माहिती नव्हती हे म्हणणे अतिशय खोटे आहे. तरी सदर प्रकार हा भाजपा आमदार महेश लांडगे यांनी जाणुन बुजून केलेला असुन, तसे करून महेश लांडगे यांनी जातीय धार्मिक तसेच भावनिक तेढ निर्माण करून पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न हा जाणुन बूजून केलेला आहे व त्याचप्रमाणे सदर प्रकारामुळे बरेच नागरिकांचे धार्मीक भावनांना ठेस पोहचवण्याचे काम भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केलेले आहे, त्यामुळे सदर बाबत समस्त बांधवांची कायदेशिर तकार आहे.
तरी सदर बाबत कायदेशिर गुन्हा दाखल करणे गरजेचे असुन, सदर बाबत कायदेशिर गुन्हा दाखल न झाल्यास सदर बाबत भविष्यात कोणीही उठुन सूटून अशा प्रकारे कोणाचेही धार्मीक भावनांना हनन करून नंतर माफी मागतील व त्यामुळे याबाबत माफी अथवा दिलगीरी व्यक्त करणे हे कायमचेच होवुन जाईल, त्यामुळे सदर बाबत कायदेशिर गुन्हा हा मुळ व्यक्ती म्हणजेच भाजपा आमदार महेश लांडगे यांच्यावर दाखल करण्यात यावा व ती माहिती पिंपरी चिंचवडकरांना पुरवण्यात यावी.