गडचिरोलीत शहिद झालेल्या 16 शुरवीरांना आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून श्रध्दांजलि
पिंपरी (वास्तव संघर्ष) :महाराष्ट्र दिन कामगार दिनाच्या (दि. 1 मे) रोजी गडचिरोली येथे नक्षलींनी महाराष्ट्र देश सेवेतील जवानांवर भूसुरुंगाच्या माध्यमातून घडवून आणलेल्या प्राणघातक भ्याड हल्यात 16 शहिदांना आपले प्राण गमवावे लागले ते शहिद झाले या घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्रात व देशात ठिकठिकाणी त्याचे पडसाद सर्वसामान्य जनतेतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत . पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथील पाचपीर चौकात शहारातील सर्वसमावेशक समविचारी संस्था संघटना सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयुक्तपणे दि 3मे 2019 रोजी सायं 7 वाजता शहिदांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
तसेच नक्षलींच्या भ्याड हल्याची निंदा करित तीव्र जाहिर निषेध करण्यात आला सदर बाबतचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी व वाकड वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांना देण्यात आले व गडचिरोली भ्याड हल्ला करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन जलद करण्याची मागणी करण्यात आली ,
यावेळी प्रमुख महिला पदाधिकारी- अनिता सावळे महाराष्ट्र सदस्य बि आर एस पी , लोकशाही संस्थेचे अध्यक्ष – अजय हनुमंत लोंढे , संजीवन कांबळे , साकी गायकवाड , आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन सेना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मा श्री सुनिल ढसाळ , सामाजिक कार्यकर्ते भारत मिरपगारे , अभिनव पवार , सुंदर सुर्यवंशी , संगिता शहा , गणेश पवार , सतिश अडागळे आदी उपस्थित होते