बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

बापरे..! पिंपरीतील सुभाषनगर झोपडपट्टीचे जबरदस्तीने आणि गुंडांच्या जिवावर पुनर्वसन

पिंपरी(वास्तव संघर्ष ):  पिंपरीतील सुभाषनगरमधील रहिवाशांचे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (एसआरए) पुनर्वसन केले जाणार आहे. आज शुक्रवार (दिं.११) रोजी एसआरए अधिकारी सुभाषनगरमधील रहीवाशांना कुठलीही नोटीस न देता जबरदस्तीने  सर्वेक्षण करण्यासाठी आले होते.

यावेळी स्थानिक रहिवाशांनी सर्वेला  विरोध केला. यातील सुभाषनगर झोपडपट्टीची जागा सेंट्रल लॅन्ड म्हणून घोषीत असताना अधिका-यांना हाताशी धरून  काही राजकीय पुढारी जबरदस्तीने  सर्वेक्षण करण्यासाठी लोकांना फूस लावत आहेत. 

पिंपरीतील कराची चौक शेजारी गजबजलेल्या परिसरातील भूखंडावर सुभाषनगर झोपडपट्टी आहे. यातील जागा केंद्राची असून नव्यानव वर्षाच्या कराराने ही जागा केंद्राकडून येथील रहिवाशांना देण्याचे नियोजन आहे. या जागेवरील झोपड्यांचे एसआरए अंतर्गत जबरदस्तीने आणि गुंडांच्या जिवावर पुनर्वसन केले जात आहे. त्याबाबतची नोटीस देखील  सुभाषनगरमध्ये लावली नाही. नागरिकांना मार्गदर्शनही केले नाही. मात्र, ‘एसआरए’अंतर्गत पुनर्वसनला विरोध  करू नये, अशी भूमिका माजी नगरसेवक अरूण टाक यांनी घेतली आहे. त्यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील सोशलमिडीवर वायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की,येथील स्थानिक रहिवाशी सुनिल कांबळे यांनी एसआरए अधिकारी यांना प्रश्न केला की आमचे सर्वेक्षण कशामुळे करत आहात,तुम्हाला परवानगी मिळाली का? असे विचारत असतानाच माजी नगरसेवक अरूण टाक यांनी सुनिल कांबळे यांना धक्काबुक्की केली.याबाबत अधिक  वास्तव संघर्षशी बोलताना कांबळे म्हणाले की,आम्ही स्थानिक रहिवाशी म्हणून आमच्या हक्काच्या घरासाठी प्रश्न विचारला काय गुन्हा केला का? तसेच एसआरए अधिकारी यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे सर्वेक्षणबाबत कागदपत्रे नव्हती . सुभाषनगरमधील  झोपडपट्टी पुनर्वसन सर्वेक्षणाची नोटीस नव्हती  इतकेच काय तर सर्वेक्षण करणा-या  अधिका-यांकडे स्वतःचे असे ओळखपत्र देखील नव्हते.याबाबाबत मी प्रश्न केला म्हणून माजी नगरसेवक अरूण टाक यांनी चिडून माझ्यावर धकक्काबुकी केली. त्यामुळे मी खाली पडलो. याबाबत लवकरच मी  पोलीस तक्रार करणार आहे. असे कांबळे म्हणाले.दरम्यान, यावेळी मोठ्या संख्येने नागरिक गोळा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) सुभाषनगरच्या पुनर्वसनासाठी  केंद्राकडून परवानगी घेणे महत्वाचे आहे. कारण सुभाषनगर झोपडपट्टी सेंट्रल लॅंड (केंद्राची जमीन)  म्हणून घोषीत  असून आम्ही याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करत आहोत.मात्र असे असताना जबरदस्तीने व पुढा-याच्या इशा-याने आम्हाला बेघर करण्याचा डाव रचला आहे. मात्र आम्ही कुठल्याही गुंडगिरीला घाबर नाही आमचा लढा असाच सुरू राहणार आहे.

– अब्दुल शेख ,सामाजिक कार्यकर्ते,सुभाषनगर पिंपरी,

Share this: