भाजप शहर कार्याध्यक्षपदी शत्रुघ्न काटे; शंकर जगताप शहराध्यक्षपदी कायम
पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची निवड करण्यात आली आहे. शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली शत्रुघ्न काटे हे या पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शत्रुघ्न काटे यांना पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र दिले आहे. शहराध्यक्षपदी शंकर जगताप हेच कायम राहणार आहेत. तसेच भाजपने शंकर जगताप याना चिंचवड विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न काटे यांची नाराजी दूर करण्याच्या उद्देशाने त्यांना कार्याध्यक्षपद देण्यात आले आहे.