डॉ. बाबासाहेब यांच्या फोटोखाली नाव छापल्यामुळे आमदार महेश लांडगेंनी व्यक्त केली दिलगिरी
पिंपरी(वास्तव संघर्ष ) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आम्ही महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्याची जनजागृती करण्यासाठी काही रिक्षाचालक व हितचिंतकांनी आपल्या रिक्षांवर हुड फलक लावले आहेत. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राखाली नजरचुकीने माझ्या नावाचा फाऊंट छापण्यात आला आहे. सदर रिक्षा हुडवरील फलकांमुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, अशी भूमिका आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये भारतातील पहिले संविधान भवन उभारले जात आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यात येत असून, रिक्षा चालकांकडून रिक्षा हुडवर छावलेल्या बॅनरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राखाली महेश लांडगे यांचे नाव छापलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे शहरातील विरोधी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी समाजमांध्यमांमध्ये टिका-टिपण्णी करुन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी सोशल मीडियाद्वारे पिंपरी-चिंचवडकरांशी संवाद साधला. यामध्ये महेश लांडगे म्हणाले की, राजकीय उद्देशाने काही व्यक्ती संबंधित रिक्षांवरील हुड बॅनरबाबत समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सबंधित रिक्षांवरील जनजागृतीचे हुड काढावेत, असे आवाहन रिक्षाचालक व माझ्या सहकारी-हितचिंतकांना करीत आहे