बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

साडेतीन वर्षांपासून एक निवडणूक जनतेनेच हातात घेतली – राहुल कलाटे

पिंपरी (वास्तव संघर्ष): चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक वर्षांपासून हे प्रश्न रेंगाळलेत. करदात्यांना मागील साडेतीन वर्षांपासून एक निवडणूक जनतेनेच हातात घेतली असे राहुल कलाटे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रश्नांमुळे पिचलेल्या नागरिकांना आता चिंचवडमध्ये बदल हवा आहे. त्यासाठी जनतेनेच पोटनिवडणूक हातात घेतली असून प्रचारादरम्यान आपल्याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी सांगितले.

शिट्टी चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या राहुल कलाटे यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. युवकांची मोठी फळी कलाटे यांच्यामागे उभी आहे. महिला, पुरुष, ज्येष्ठांपासून नवमतदार युवक- युवतींचा कलाटे यांना प्रतिसाद मिळत आहे. कलाटे हे उच्चशिक्षित आणि व्हिजन असलेले उमेदवार असल्याने महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेले नवमतदार, तरुण त्यांच्यामागे उभे आहेत.

चिंचवड मतदारसंघातील विकासात समतोल साधल्याचे दिसत नाही. मतदारसंघातील अनेक भागात मुलभूत सुविधांची वानवा आहे. भाजपने चोवीस तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले होते. चोवीस तास नव्हे दररोज पाणी देण्याऐवजी दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. मागील साडेतीन वर्षांपासून चिंचवडकरांना दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे.असे देखील कलाटे म्हणाले

Share this: