तरुणाला लाकडी बांबू व पीव्हीसी पाईपने केली बेदम मारहाण
चिखली (वास्तव संघर्ष): आमच्या नवरा बायकोच्या मध्ये का येतोस म्हणत एका 20 वर्षीय तरुणाला लाकडी बांबू व पीव्हीसी पाईपने बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार रविवारी (दि.12) कुदळवाडी येथे घडली आहे.
याप्रकरणी मोहम्मद अनस चौधरी (वय 20 रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
आरशद अकबर अली खान (वय -30) व महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आरोपीकडे काही कामानिमीत्त गेले असता आरोपीने तू माझ्या व माझ्या पत्नीचे मध्ये का येतोस, आमचे आम्ही पाहून घेऊ असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच लाकडी बांबू व पीव्हीसी पाईपने मारहाण करून जखमी केले तसेच तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. याबाबत अधिक तपास चिखली पोलीसकरत आहेत.