बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

भगवान गौतम बुद्ध उद्यानाचे महापौर माई ढोरे यांच्या हस्ते लोकार्पण

पिंपरी (वास्तव संघर्ष) : आज उद्घाटन झालेले तथागत भगवान गौतम बुद्ध  उद्यान हे उद्यानात येणाऱ्या  सर्वांना शांती व समानतेची प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 30 दापोडी येथे उभारण्यात आलेल्या  तथागत भगवान गौतम बुद्ध उद्यान आणि इतर विकासकामांचा  लोकार्पण समारंभ  महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास नगरसदस्य रोहित काटे, राजू बनसोडे,  नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे,आशा धायगुडे- शेंडगे, स्वीकृत नगरसेवक संजय कणसे,अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे,अण्णा बोदडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे,शंकर जंजाळे,शेखर काटे, छाया जाधव आदी उपस्थित होते.   

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने  दापोडी येथे आ. क्र. 3/13 मध्ये 2 हेक्टर जागेमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध उद्यान उभारण्यात आले असून या उद्यानात लॉन, पाथवे, कंपाउंड वॉल, आकर्षक प्रवेशद्वार, लहान मुलांसाठी खेळणी तसेच स्केटिंग रिंग तयार करण्यात आले आहे. या कामासाठी सुमारे 1कोटी रुपये इतका खर्च झाला आहे.त्याचप्रमाणे  गुलाबनगर परिसरात नवीन दोन मजली  व्यायामशाळा विकसित करण्यात आली असून परिसरातील नागरिकांना याचा आरोग्याच्या दृष्टीने उपयोग  होणार आहे. या कामासाठी सुमारे 22 लाख  रुपये इतका खर्च झाला आहे. याच ठिकाणी  दोन मजली नविन समाजमंदिरही बांधण्यात आले आहे. या समाजमंदिराचा उपयोग  या भागातील नागरिकांना होणार  आहे.या कामासाठी सुमारे 18 लाख रु खर्च झाला आहे. अशी माहिती कार्यकारी अभियंत्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Share this: