भाजप आमदार महेश लांडगेंचा प्रताप ;बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवर छापली स्वतःची सही
पिंपरी(वास्तव संघर्ष): भारतीय संविधान भवन आता पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या दृष्टीक्षेपात आले असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) प्रशासनाने प्रस्तावित जागा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने भारतीय राज्यघटना आणि जगभरातील लोकशाही देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करता यावा. तसेच, संविधानाबाबत जनजागृती व्हावी. या करिता भारतातील पहिले संविधान भवन उभारण्यात येत आहे.
मात्र असे असताना प्रसिध्दीच्या हव्यासापोटी भाजप आमदार महेश लांडगे यांचा नवीन प्रताप समोर आला आहे. विश्वरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवर आमदारांनी चक्क स्वतःची सही छापली आहे त्यामुळे आंबेडकरी कार्यकत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
भाजप आमदार महेश लांडगे यांनी भारतीय संविधान भवनाची जाहिरात करत असताना अॅटो रिक्षावर ‘ विचार लोकशाहीचा,अभिमान संविधानाचा’ अशी टॅगलाईन टाकून एका बाजूला संविधान निर्माते डॅा.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि दुस-या बाजूला स्वताचा फोटो छापला आहे. असे असताना आमदार यांनी स्वताच्या फोटोवर सही न करता बाबासाहेब यांच्या फोटोवर स्वताची सही छापली आहे. असे अनेक रिक्षा सध्या पिपरी चिंचवड शहरात त्यांनी फिरवले आहेत . त्यातीलच एक रिेक्षाचा फोटो सोशलमिडीयावर वायरल झाला आहे . आता या फोटोंमुळे भाजप आमदार महेश लांडगे सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. तसेच यूजर्स या फोटोंवर वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. मात्र याबाबत अजूनतरी आमदार महेश लांडगे यांनी कुठलेही उत्तर दिले नाही.
दरम्यान, मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात उभारण्यात येणाऱ्या १०० फूट उंचीच्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या काही भागांना तडे गेल्याचे समोर आले होते आणि आता संविधान निर्माते विश्वरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवर आमदारांनी चक्क स्वतःची सही केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार असलेल्या भोसरी विधासभेत या दोन महापुरूषांचा अवमान करण्याचा प्रकार झाला आहे हे मात्र नक्की.