बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेतील विरोधीपक्षनेते पदी नगरसेवक राजू मिसाळ यांची नियुक्ती

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत विरोधीपक्षनेते ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे . त्याबाबतचा प्रस्ताव आज ( दि .7 ) नगरसचिवांकडे जमा करण्यात आला . गटनेतेपदी मिसाळ यांची निवड झाल्याची नोंदणी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे करण्यात येणार आहे . एक वर्षाचा कालावधी संपल्याने नाना काटे यांनी 2 सप्टेंबर रोजी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता . विरोधी पक्षनेते पदासाठी माजी महापौर वैशाली घोडेकर , माजी उपमहापौर राजू मिसाळ , स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यात रस्सीखेच होती . त्यात मिसाळ यांनी बाजी मारली आहे

34 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीचा गटनेता पालिकेचा विरोधी पक्षनेता असल्याने मिसाळ नवे विरोधी पक्षनेते असणार आहेत . विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे अधिकृत नोंदणी झाल्यानंतर महापौर उषा ढोरे या मिसाळ यांच्या नियुक्तीची घोषणा करतील . राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिकेत जनतेतून निवडून आलेले 36 नगरसेवक होते . त्यातील कोरोनामुळे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने , जावेद शेख यांचे दुर्दैवाने निधन झाले आहे . त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ 34 वर आले आहे . राष्ट्रवादी काँग्रेसने दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे .त्यामुळे आता मिसाळ यांना विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळाली आहे.

नगरसेवक राजू मिसाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत . त्यांची नगरसेवकपदाची तिसरी टर्म आहे . यापूर्वी त्यांनी उपमहापौर , क्रीडा समिती सभापती , प्रभाग समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे . स्थायी समितीचे दोन वर्षे सदस्य देखील ते होते .

Share this: