क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

वाहनचोरी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात ;तीन रिक्षांसहीत सहा मोटार सायकली चिंचवड पोलीसांनी केल्या हस्तगत

पिंपरी (वास्तव संघर्ष) :चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या वाहन चोरी , घरफोडी यांना प्रतिबंध करण्यासाठी चिंचवड तपास पथकाचे पोलीस हवालदार जगताप आणि शेलार हे पेट्रोलींग करीत असताना रिव्हर व्युह हॉटेलजवळ त्यांना एक हिरो होन्डा कंपनीची पॅशन प्लस मोटारसायकल नं (एम एच १४ बी जी ५१२१) गाडीवरून तिन मुले समोरून येताना दिसल्याने व संशयीत वाटल्याने त्यांना थांबवून त्यांच्याकडे मोटारसायकलच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने अधिक चौकशीसाठी पोलीस चौकीस आणून माहिती घेतली असता सदरची तिनही मुले ही  नाबालिक असल्याचे निष्पन्न झाले .

त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव व स्टाफने सदर बालकांना विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्या मुलांनी सदरची मोटार सायकल ही रांका ज्वेलर्स समोरील इम्पायर इस्टेट ब्रिजखालून चोरल्याचे कबुल केले . त्याबाबत चिंचवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं . २० ९ / २०२० भा.दं.वि. कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली . सदर नाबालिक बालकांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे इतर ठिकाणी केलेल्या चोरीबाबत चौकशी केली असता त्यांनी मौजमजा करण्यासाठी व फिरण्यासाठी खडकी , चतुश्रृंगी , हिंजवडी , वाकड , एम आय डी सी भोसरी येथून रिक्षा व मोटारसायकली चोरल्याचे कबूल केले . त्यांचेकडून तपासात चोरी केलेल्या ०३ रिक्षा व ०६ मोटार सायकली जप्त केल्या आहेत . या नाबालिक बालकांनी चोरलेल्या मोटारसायकली बाबत खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत .

१ ) चिंचवड पो स्टे गु.रजि.नं- २० ९ / २०२० भादवि कलम ३७ ९ ( हिरो होन्डा पॅशन मो.सा ) २ ) वाकड पो स्टे गु.रजि.नं- ६३/२०२० भादवि कलम ३७ ९ ( बजाज पल्सर २२० मो.सा ) ३ ) वाकड पो स्टे गु.रजि.नं- ५ ९ २ / २०२० भादवि कलम ३७ ९ ( ऑटो रिक्षा ) ४ ) हिंजवडी पो स्टे गु.रजि.नं- ३६५/२०२० भादवि कलम ३७ ९ ( हिरो होन्डा स्प्लेन्डर मो.सा ) ५ ) एम.आय.डी.सी.भोसरी पो स्टे गु.र.नं –४६६ / २०१ ९ भादवि कलम ३७ ९ ( होन्डा अॅक्टीवा मो.सा ) ६ ) चतुश्रृंगी पो स्टे गु.रजि.नं- १२०४/२०२० भादवि कलम ३७ ९ ( ऑटो रिक्षा ) ७ ) खडकी पो स्टे गु.रजि.नं- ३०८/२०२० भादवि कलम ३७ ९ ( ऑटो रिक्षा ) ८ ) हिरो होन्डा सी.डी. डॉन क्र- एम एच १० एक्स ५८६८ ( मोटारसायकल ) ९ ) महिंद्रा रोडिओ मोपेड क्र- एम एच १४ सी झेड ८४२२ ( मोटारसायकल )

वरीलप्रमाणे तिनही नाबालिक बालकांकडून एकुण ०३ ऑटो रिक्षा व ०६ मोटारसायकली असा एकूण ३ लाख ५० हजार रु . चा मुद्देमाल जप्त केला आहे . अधिक तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

सदरची कामगीरी ही मा.श्री कृष्णप्रकाश साो पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड , श्री रामनाथ पोकळे साो अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड , श्रीमती स्मिता पाटील मॅडम पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पिंपरी चिंचवड , श्री रामचंद्र जाधव साो सहा पोलीस आयुक्त साो पिंपरी विभाग , श्री रविंद्र जाधव सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिंचवड पोलीस ठाणे , श्री विश्वजीत खुळे सो पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव , पो हवा पांडुरंग जगताप , पो ना स्वप्निल शेलार , पो ना रुषीकेश पाटील , पो ना विजयकुमार आखाडे , पो शि नितीन राठोड , पो शि पंकज भदाणे , पो शि गोविंद डोके व पो शि अमोल माने यांनी केली आहे .

Share this: