आरोग्यबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

स्थायी समिती सभेच्या दालनासमोर राष्ट्रवादीचे कचरा आंदोलन;आयुक्तांनाही जावे लागले कच-याच्या ढिगाऱ्यावरून

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :-  पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याचे काम दि. १ जुलै पासून सुरु केले आहे. माञ शहरात कचर्‍याचा प्रश्न भिषण असताना कचरा प्रश्नांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने आज दि ९ रोजी महापालिकेच्या स्थायी समिती सभेच्या दालनासमोर आंदोलन केले. कच-याचा ढिगाऱ्यावरून अक्षरशः आयुक्तांना जावे लागले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे म्हणाले महापालिकेने नवीन कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांची शहरात आणल्या परंतू कच-याचा प्रश्न जैसा थे आहेच. कचरा गाडीचा ञास वयोवृद्ध महीला घरेलू महीलेला आणि सामान्य नागरिकांना होत आहे.या कचरा संकलनाच्या गाडीची उंची सामान्य नागरिकांच्या उंची पेक्षा जास्त आहे. त्यामुळे वृध्द  महिला आणि नागरिकांनी टाकलेला कचरा उडून त्यांच्या नाकातोंडात जात आहे. तसेच  ओला सुका आणि घातक कचरा वेगळा करण्यासाठी गाडीमध्ये वेगळी नियोजन व्यवस्था करण्यात आली नाही. माञ आयुक्त या प्रश्नावर बोलत नाही.
यावेळी नगरसेवक पंकज भालेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मयुर कलाटे उपस्थित होते.

Share this: