पिंपरी चिंचवडमध्ये महिलांसाठी सार्वजनिक शौचालय उभारा:विक्रम पवार
पिंपरी (वास्तव संघर्ष): पिंपरी चिंचवड शहरातील लोकसंख्या ही तीस लाखाच्या घरात येऊन पोहोचली आहे .स्वच्छ सर्वेक्षण आणि आरोग्य याबाबत पालिकेला नंबर वन बनवण्यासाठी मनपा प्रशासनाने शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने महिला व पुरूषासाठी शौचालय उभारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते विक्रम पवार यांनी केली आहे.
विक्रम पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात महिलांची मोठी संख्या असून त्यांच्यासाठी शौचालय नसल्याने त्यांची कुचंबना होत आहे.स्मार्ट पिंपरी चिंचवड शहरात महिलांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न प्रशासनाने जाणुनबुजून करू नये.तसेच महिला आणि पुरुषांसाठी शहरात शौचालय उभा करावे अशी मागणी केली आहे.