क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सांगवीतील तलवार आणि कोयता हल्ला प्रकरण ; अवघ्या चार तासात आरोपींना पोलिसांनी केली अटक 

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात
दहा ते बारा टोळक्यांनी दहशत निर्माण करून वाहनाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली होती . यावेळी टोळक्यांनी तलवार आणि कोयत्याचा वापर करून चारजणांना जखमी देखील केले होते. ही घटना सांगवीतील पिंपळे निलखमध्ये रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली होती. मात्र  सांगवी पोलिसांसह या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट चारचे पथक करीत होते .या तपासणीत आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याबाबत राजकुमार पिल्ले (वय – २५,पिपळेसौदागर) यांनी फिर्याद दिली आहे होती . त्यानुसार चेतन अहिरे ( रा . पिंपळे निलख ) समीर शेख ( रा . कस्तुरबा गांधी झोपडपट्टी , औंध ) आणि त्याचे बारा अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

त्यानुसार कुणाल राजेंद्र सरतापे ( वय २० ) , चेतन रामनवल साहानी ( वय २२ , दोघेही रा . कस्तुरबा गांधी वसाहत , बौध्द विहार , औंध , पुणे ) , रोहन कुमार जोगदंड ( वय २२ ) , यशवंत सुनिल अवघडे ( वय २१ , दोघेही रा . इंदीरा वसाहत , आंबेडकर चौक , औंध पुणे ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत . पोलिसांनी चार तासात ११ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यापैकी सात आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे .

Share this: