शिवशाही व्यापारी संघाच्या प्रभारी प्रदेश सचिवपदी आशिष वाळके यांची निवड जाहीर
पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिवपदी (प्रभारी )आशिष हरिहर वाळके यांची शिवशाही व्यापारीसंघ शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश संघटक रविकिरण घटकार यांच्या सुचनेने व प्रदेश सदस्य रोहीत विभुत्ते यांच्या आनुमोदनाने आशिष वाळके यांच्या प्रदेश सचिव पदाच्या निवडीची घोषणा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली.
यावेळी खजिनदार नवनाथ माऊली जाधव,प्रदेश संघटक रविकिरण घटकार,प्रदेश सदस्य रोहीत विभुत्ते, निलेश भोरे,मारूती मस्के, गणेश पाडुळे,प्रसिध्दीप्रमुख दत्ता गिरी,आदींनी पेढा भरवून आभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
नवनियुक्त प्रदेश सचिव आशिष वाळके यांनी व्यापारी वर्ग व सर्व सामान्य जनतेची तसेच दिव्यांग,विधवा माताभगिंनीची अखंड सेवा करून शिवशाही व्यापारीसंघा बरोबर शिवसेना वाढीसाठी कटिबद्द राहण्याच्या सुचना युवराज दाखले यांनी देऊन पुढील कायाॕसाठी शुभेच्छा दिल्या.