क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

‘मी जेलबाहेर आलो तर सोडणार नाही ‘ पहा कुणी दिली पोलिसाला भरचौकीत धमकी

निगडी (वास्तव संघर्ष) : निगडीतील यमुनानगर पोलीस चौकीत एका व्यक्तीच्या विरोधात तक्रार नाही देत म्हणून पत्नीचा गळा दाबणाऱ्या पतीला आडवणा-या पोलिसाला धक्काबुक्की करण्यात आली. तसेच भर पोलीस चौकीत राडा घालून माझ्यावर गुन्हा दाखल करून अटक केल्यास जेलमधून बाहेर आल्यावर मी सोडणार नाही , अशी धमकी दिली . ही घटना रविवारी ( दि . 1 ) रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली .

पोलीस उपनिरीक्षक उत्तम बी. ओमासे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

सुरज असकर चौधरी ( रा .स्वामी विवेकानंद शाळेसमोर सेक्टर नं 22 इंदिरानगर ओटास्कीम , निगडी ) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी सुरज हा त्याच्या पत्नीसह विशाल प्रकाश पंडित यांच्या विरोधात पोलीस तक्रार देण्यासाठी राञी दोनच्या सुमारास यमुनानगर पोलीस चौकीत आला होता . विशाल पंडित यांच्या विरोधात तक्रार का देत नाही म्हणून समजून सांगण्यासाठी आरोपी सुरज याने त्याच्या पत्नीला पोलिस चौकीच्या बाहेर नेले . तिथे त्याने पत्नीचा गळा दाबला . त्यावेळी पत्नीने आरडाओरड केली . महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून चौकीतील फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक ओमासे आणि मार्शलचे कर्मचारी गरदरे बाहेर आले . पोलिसांनी आरोपी याच्या पत्नीला सुरजच्या तावडीतून सोडवून चौकीत नेले . त्यावेळी सुरज याने पोलीस उपनिरीक्षक ओमासे आणि पोलीस नाईक गरदरे यांना धक्काबुक्की केली . पोलीस चौकीतील टेबलवर बसून खिडकीच्या काचा फोडल्या . स्वतःच्या हाताने काचा गळ्यावर मारून स्वतःला जखमी करून घेतले . तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यास फिर्यादी उपनिरीक्षक ओमासे यांना मी बाहेर आल्यावर सोडणार नाही , अशी धमकी दिली .पोलिसांनी आरोपी सुरज चौधरी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Share this: