क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

घरावर प्लास्टिक कागद टाकल्याचा वाद गेला विकोपाला;दरवाजावर दगडफेक करून दिली जिवे मारण्याची धमकी

भोसरी (वास्तव संघर्ष) – भोसरीतील एका घरावर प्लास्टिक कागद टाकल्याचा वाद विकोपाला गेल्याने पाच जणांनी तरुणाला आणि त्याच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली . ही घटना शुक्रवारी ( दि . 30 ) दुपारी साडेतीन वाजता दिघी गावठाण येथील विठ्ठल मंदिरासमोर घडली .

शुभम संतोष वाळके ( वय 24 , रा . विठ्ठल मंदिरासमोर , दिघी गावठाण ) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली .

विश्वकांत वाळके , ऋतिक वाळके , निलेश वाळके , अनिता वाळके , भारत वाळके ( सर्व रा . दिघी गावठाण , दिघी ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी आणि फिर्यादी हे एकाच ठिकाणी राहण्यास असून ते एकमेकांचे नातेवाईक आहेत . आरोपींनी फिर्यादीच्या घरावर प्लास्टिकचा कागद टाकला . त्याबाबत फिर्यादी यांनी आरोपींकडे विचारणा केली . त्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी शुभम आणि त्यांच्या घरच्यांना शिवीगाळ केली . तसेच घराच्या दरवाजावर दगडफेक केली.आरोपी ऋतिक आणि निलेश यांनी शुभम यांच्या दुचाकीवर दगड मारून तिचे नुकसान केले . त्यानंतर आरोपी विश्वकांत आणि अनिता यांनी शुभम आणि त्यांच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . अधिक तपास दिघी पोलीस तपास करीत आहेत .

Share this: