आरोग्यमाझं पिंपरी -चिंचवड

पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा…!कै. दत्ताकाका साने यांचे चिरंजीव सर्वसामान्यांच्या आरोग्यांसाठी मैदानात

चिखली(वास्तव संघर्ष) :-गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे,सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे तसेच महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडणारा वाघ म्हणजे दत्ताकाका साने यांचे नाव अख्ख्या पंचक्रोशीत आहे. काही दिवसांपूर्वी दत्ताकाका यांचे निधन झाले माञ आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल टाकत, दुःख बाजुला ठेवुन जनसेवेसाठी स्वर्गीय दत्ताकाका साने यांचे चिरंजीव यश साने यांनी कामाला सुरुवात केली आहे..

पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा…! असं म्हणत यश दत्ताकाका साने यांनी करोनाविरूध्दच्या लढाईसाठी मैदानात उतरून वडिलांच्या विचारांचा वारसा चालवण्याचे काम हाती घेतले आहे.प्रभागात नुकताच कोरोना रूग्ण आढळल्याने यश यांनी लागलीच सर्व प्रभाग सॅनिटायझर करण्याचा निर्णय घेतला. तसेच प्रभागातील प्रत्येक नागरिकांना मास्क दत्ताकाका साने स्पोर्ट्स क्लब तर्फे वाटण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर आणि प्रभाग क्रमांक एक मध्ये विविध कामांच्या माध्यमातून जनमानसात दत्ताकाका साने लोकप्रिय झाले होते. करोना काळात जनसेवा करतानाच त्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या कार्याची महती सर्वदूरपर्यंत होती. त्यांच्या कार्यामुळेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या कुटूंबियांना भेट देऊन सात्वंन केले.

आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल टाकत जनसेवेसाठी त्यांचे चिरंजीव यश यांनी पुढाकार घेतला. वडिल गेल्याचे दुःख बाजुला सारून प्रभाग एक मधील काही सोसायट्यांना सॅनिटाईझर फवारणी, करोना जनजागृती यासाठी पुढाकार घेऊन काम सुरु केले. यश यांच्या या कामामुळे प्रभागातील अनेक नागरिकांना गहिवरून आले होते. वडिलांच्या विचारांचा वारसा चालवण्यासाठी यश खंबीरपणे उभार राहीला आहे. त्याच्या या कार्याला प्रभागातील नागरिकांनी सलाम केला आहे.

Share this: