पञकार अर्णव गोस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करा ; पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसची मागणी
पिंपरी (वास्तव संघर्ष) –काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन अपमान करणा-या आर रिपब्लिक टीव्हीचे पञकार अर्नब गोस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताकडे केली आहे.
पालघर येथे माॅबलींचिंग प्रकरणावर आधारित टीव्हीवरील एका कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर पञकार अर्णव गोस्वामी याने टिका केली होती .
याबाबत नरेंद्र बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.त्यामध्ये ते म्हणाले की, आर रिपब्लिक टीव्हीवर 21 एप्रिलला पालघर झुंडबळीवर आधारित एक कार्यक्रम दाखवण्यात आला. दाखवलेल्या शोमध्ये दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण होईल असे जाणीवपूर्वक भाष्य गोस्वामी यांनी केले.१७एप्रिलच्या पालघर येथील झुंडबळीच्या घटनेबद्दल त्यांचे विधान चुकीचे व आक्रमक होते. कार्यक्रमात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरुद्धही अपशब्द वापरून समाजामध्ये त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न गोस्वामी यांनी केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दलही गोस्वामी यांनी अपशब्द वापरले. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल नरेंद्र बनसोडे यांनी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे गोस्वामी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे