पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा तीसरा बळी ;थेरगांव आणि खराळवाडीतील त्या रूग्णांची कोरोना चाचणी निगेटिव्ह
पिंपरी (वास्तव संघर्ष ) – पिंपरी चिंचवडमधील कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात ६७ वर्षीय करोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे. मृत महिला ही मार्केट यार्ड गुलटेकडी पुणे येथे राहणारी होती. शहरातील हा कोरोनाने तीसरा बळी घेतला आहे.
सविस्तर वृत्त असे की, पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात राहणाऱ्या या ६७ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली होती. या महिलेवर पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या महिलेचा सोमवारी (दि. 22) रोजी मृत्यू झाला.
दरम्यान, आज पिंपरी चिंचवडमध्ये ६७ कोरोनाचे ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळले असून त्यापैकी तीघांचा मृत्यू झाला आहे. थेरगांव आणि खराळवाडी येथील रहिवासी असलेले कोरोना बाधीत रुग्ण वायसीएम रुग्णालयात दाखल होते. यांची दोन्ही वेळची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आलेले आहे